Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंड्या स्टोअर या मालिकेच्या विशेष भागांत आदित्य नारायणची खास उपस्थिती

Webdunia
आदित्य नारायण ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पंड्या स्टोअर’च्या विशेष भागात खास उपस्थित राहणार आहे. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ‘स्टार प्लस’वर हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत. ‘पंड्या स्टोअर’ मालिकेच्या विशेष दुहेरी भागांमधल्या उपस्थितीविषयी आदित्यने आपले मनोगत व्यक्त केले.
 
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका ‘पंड्या स्टोअर’चे प्रत्येक दिवशी दोन भाग संपूर्ण आठवडाभर प्रसारित केले जाणार आहेत. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत दररोज संध्याकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ७.३० वा. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दोन विशेष भाग प्रसारित केले जातील. या मालिकेने अलीकडेच एक हजार भागांचा एक मैलाचा दगड पूर्ण केला आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे मिळालेले प्रेम आणि समर्थन पाहून, संपूर्ण आठवडाभर- दररोज या मालिकेचे दोन विशेष भाग दाखवण्यात येतील, असे घोषित करण्यात आले आहे. या निमित्ताने ‘स्टार प्लस’ने आपल्या प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवण्याची जणू योजना आखली आहे. ‘पंड्या स्टोअर’ या मालिकेचे आगामी कथानक धवलभोवती फिरणार आहे. जीवन-मरणाशी लढा देणारा धवल नताशासोबत घरी परततो, या संबंधात हे कथानक असेल. त्याचे कुटुंबीय- धवलचे स्वागत करणार आहेत आणि एक खास पाहुणा धवलच्या घरी परतण्याची वाट पाहत आहे.
 
बॉलीवूडचा युवा गायक आदित्य नारायण २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान संध्याकाळी ६ वाजता आणि नंतर संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष दुहेरी भागांमध्ये ‘पंड्या स्टोअर’ मालिकेत खास उपस्थित राहणार आहे. या मालिकेतील त्याच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील, यात शंकाच नाही! ‘पंड्या स्टोअर’ कुटुंबासोबत मंच शेअर करताना आदित्य नारायणचे जादूई सादरीकरण पाहणे ही प्रेक्षकांकरता एक दृक् मेजवानी असेल! गायक आदित्य नारायण धवल आणि नताशा यांना एकत्र आणून त्यांच्यात प्रेमाचे धागे विणले जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते.
 
याबाबत युवा गायक आदित्य नारायण मनोगत व्यक्त करताना म्हणाला, “पंड्या स्टोअर’ ही घरोघरी आवर्जून बघितली जाणारी लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक आहे, ज्या मालिकेला प्रेक्षकांचे अतोनात प्रेम मिळाले आहे आणि त्यातील पात्रे तर घराघरांत चांगलीच परिचयाची झाली आहेत. अशा उत्साहात, ‘पंड्या स्टोअर’ने एक हजार भागांचा मैलाचा दगड पूर्ण केला असून या मालिकेच्या प्रवासाचा  आणि २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आठवड्याभराकरता दररोज संध्याकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ७.३० वाजता दाखवल्या जाणाऱ्या दुहेरी भागांत मी सहभागी होत आहे. हा माझ्याकरता थरारक अनुभव आहे. त्यांची कथा पडद्यावर जशी रंजक दिसते, तशीच कॅमेऱ्याच्या पलीकडेही या कलाकारांमधील भावनिक नातेसंबंध आश्चर्यकारक आणि खूप मजेदार आहेत! धवलचे घरी स्वागत करण्यासाठी आयोजित उत्सवात मी सहभागी होणार आहे. मकवाना कुटुंब आणि मी एकत्र येत आहोत, तेव्हा आमच्या आनंदात सहभागी होण्याकरता आम्ही तुम्हांला आमंत्रित करत आहोत. हा एक जादुई उत्सव असणार आहे. तो पाहण्याकरता जरूर सज्ज रहा!”
 
‘पंड्या स्टोअर’ची निर्मिती ‘स्फिअर ओरिजिन्स’ची आहे. ‘पंड्या स्टोअर’ २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आठवड्याभराकरता दररोज संध्याकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ७.३० वाजता ‘स्टार प्लस’ वाहिनीवर हे दोन विशेष भाग प्रसारित केले जातील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

कंगना राणौतला तिचे वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, ती बनली बॉलिवूडची क्वीन

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

सर्व पहा

नवीन

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments