Marathi Biodata Maker

‘कुली नंबर १’ चे अनोखे पोस्टर

Webdunia
गुरूवार, 11 जून 2020 (20:47 IST)
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन  ने सोशल मीडियावर ‘कुली नंबर १’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर त्याने शेअर केले आहे. या पोस्टरवर देखील करोनाचा इफेक्ट पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये वरुणच्या तोंडावर मास्क लावलेला दिसत आहे. या अनोख्या पोस्टरमुळे ‘कुली नंबर १’चं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  वर्षाच्या सुरुवातीस या चित्रपटाचं चित्रीकरण संपणार होतं. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवण्यात आलं. 
 
आता देशभरातील लॉकडाउन हळूहळू उठवला जात आहे. निर्मात्यांना चित्रीकरणाची संमती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे पोस्टर पाहून वरुण देखील चित्रीकरणासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

New Year 2026 Tourism देशातील या शहरांमध्ये होते नवीन वर्षाची अद्भुत सुरुवात

हेमा मालिनी यांनी दिल्लीत धर्मेंद्रसाठी प्रार्थना सभा आयोजित केली, दोन्ही मुली सोबत राहणार

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

गायक मोहित चौहान स्टेजवर गाताना अचानक खाली कोसळला, लोक मदतीला धावले

पुढील लेख
Show comments