Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Career Tips:चांगले करिअर घडवण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा

Webdunia
रविवार, 3 जुलै 2022 (16:47 IST)
Tips For Career Development : उत्तम करिअर बनवायचे असेल तर तुम्हाला पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. खरं तर, फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहून तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकत नाही, पुस्तकी ज्ञानाशिवाय इतरही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या.ज्या तुम्हाला चांगले करिअर घडवण्यात खूप मदत करतात.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1. तुमची प्रतिभा शोधा-
तुम्हाला उत्तम करिअर घडवायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि तुमच्यातील प्रतिभा शोधण्याची गरज आहे. एकदा तुम्हाला तुमच्यातील दडलेली प्रतिभा सापडली की मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या क्षेत्रात इतर लोकांपेक्षा चांगले स्थान मिळवू शकता.
 
2. आत्मविश्वास सर्वात महत्वाचा आहे- 
जीवनाची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकात आत्मविश्वास हवा. तुमच्यात क्षमता असेल पण आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कितीही मोठी पदवी घेतली तरी तुम्ही काहीही करू शकत नाही. अभ्यासासोबतच अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत राहा ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
 
3.संपर्क वाढवा- 
 करिअर घडवण्यासाठी लोकांशी संपर्क असणे महत्त्वाचे आहे. सर्वोत्तम संपर्क तुम्हाला उत्तम करिअरची संधी देऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना भेटत राहा आणि त्यांना तुमची माहिती देत ​​राहा आणि त्यांची माहिती घ्या.लोकांशी संपर्क वाढवून यश संपादन करा. 
 
4टेक्नो फ्रेंडली व्हा- 
सर्वोत्तम करिअरसाठी तुम्हाला टेक्नो फ्रेंडली असण्याची गरज आहे. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो. तुमच्या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान असावे. यासोबतच नवनवीन तंत्रज्ञान शिकत राहा.
 
5 स्वतःशी प्रामाणिक रहा- 
खोटे बोलणे फार काळ टिकत नाही, म्हणून नेहमी स्वत:शी प्रामाणिक राहा आणि तुमची खरी प्रतिमा लोकांसमोर मांडा खोटं काही दाखवू नका. कारण खोटं जास्तकाळ टिकून राहत नाही. याशिवाय तुमच्या कामाप्रती नेहमी प्रामाणिक राहा, तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला सर्वोच्च स्थानावर नेऊ शकतो.
 
6. जास्त महत्वाकांक्षी होऊ नका- 
खूप महत्त्वाकांक्षी असणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जरी प्रत्येक मनुष्याने महत्वाकांक्षी असणे देखील महत्त्वाचे आहे, परंतु अतिमहत्त्वाकांक्षी असणे आपले नुकसान करू शकते.
 
7.स्वतःला अपडेट करत रहा- 
आजकाल मोबाईल अॅप्सही स्वत:ला अपडेट करण्यासाठी बोलतात, त्यामुळे तुम्हीही वेळेनुसार स्वत:ला बदलत राहणं गरजेचं आहे. चांगल्या करिअरच्या दृष्टीने आपले मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःला अपडेट करत राहणे खूप महत्वाचे आहे.
 
8 वागणूक चांगली ठेवा - 
तुमची वागणूक तुमचा आरसा आहे, त्यामुळे इतरांशी वागायला शिका. तुम्ही लोकांशी चांगले वागलात तर लोक तुमच्याशी चांगले वागतात, नाहीतर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतात. याशिवाय तुमची चांगली वागणूक तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग खुला करते, त्यामुळे इतरांशी चांगले वागायला शिका.
 
9 कुटुंबाला प्राधान्य द्या-
अलीकडे लोक करिअरच्या शोधात आपल्या कुटुंबापासून लांब होतात. आपल्या करिअरमधील चढ-उतार आणि तणावाच्या वेळी तुमचे कुटुंब तुमच्या मदतीला धावून येते. त्यामुळे तुमच्या कुटुंबाशी जोडलेले राहा आणि तुमच्या नात्यात कधीही अंतर येऊ देऊ नका.
 
10 -आपल्या कडे पर्याय ठेवा-
असे अनेकवेळा घडते जेव्हा तुमचे करिअरमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे ठरू लागतात,अशा वेळी आपल्याकडे नेहमी पर्याय ठेवा. जेणे करून एक निर्णय चुकला तर लगेच दुसरा निर्णय घेऊ शकता. 
 
 
 
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

पुढील लेख
Show comments