Marathi Biodata Maker

घरच्या घरी तयार करा शेजवान सॉस

Webdunia
जास्तकरून इंडो चायनीज डिशमध्ये शेजवान सॉस घातला जातो पण कधी तुम्ही विचार केला आहे की हे घरी कसे बनवू शकता का? आज आम्ही तुम्हाला शेजवान सॉस तयार करण्याची विधी सांगत आहोत जे फारच टेस्टी लागते. तुम्ही याला बनवून आरामात एक ते दोन आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकता. शेजवान सॉसला मोमोज़, पराठे किंवा फ्राइड राइससोबत सर्व करू शकता.  
 
साहित्य - वाळलेल्या लाल मिरच्या - 1 कप, तेल- 1/3 कप, लसणाची पेस्ट - 4 चमचे, आल्याची पेस्ट - 3 चमचे, सोया सॉस- 1 चमचा, टोमॅटो केचप- 3 चमचे, साखर - 1/4 चमचा, मीठ - चवीनुसार.  
 
विधी - सर्वप्रथम आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्या. एक कप पाण्यात लाल मिरची ज्याच्या बिया काढलेल्या असतील त्यांना उकळून घ्या. जेव्हा उकळणे सुरू होईल तेव्हा त्याला कमी आचेवर ठेवा आणि 5 मिनिटापर्यंत उकळा. त्यानंतर पाणी गाळून मिरच्यांना हलक्या हाताने वाटून घ्या. आता एक पेनामध्ये तेल गरम करा, त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. नंतर मिरच्यांची पेस्ट, सोसा सॉस, टोमॅटो केचप, साखर आणि मीठ घालून मिक्स करा. मध्यम आचेवर ठेवा. जेव्हा सॉस शिजून जाईल आणि तेल सोडायला लागेल तेव्हा गॅस बंद करून द्या. सॉसला थंड करून फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. हा सॉस किमान 2 आठवड्यापर्यंत राहू शकतो.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

डाळ शिजवताना या चुका टाळा; संपूर्ण पोषण मिळवण्यासाठी योग्य पद्धत जाणून घ्या

साडीमध्ये दिसा अधिक आकर्षक – या ५ टिप्स फॉलो करा

Fish Oil Capsules तुम्ही मासे खात नसाल, तर 'या' कॅप्सूल ठरतील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय! जाणून घ्या याचे फायदे आणि योग्य वापर

Panipuri सर्वांची लाडकी 'स्ट्रीट स्टाईल' रेसिपी; "घरीच बनवा मार्केटसारखी पाणीपुरी"

डोशाचे पीठ खूप पातळ झाले असेल तर घट्टपणा येण्यासाठी या टिप्स वापरा...

पुढील लेख
Show comments