Marathi Biodata Maker

शिवभारत अध्याय बत्तिसावा

Webdunia
मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (13:05 IST)
कवींद्र म्हणाला :-
नंतर शिवाजीनें जुना राजनीतिमार्ग चालू करून सर्वच प्रभावली प्रांत स्वपराक्रमानें आपल्या हस्तगत केला. ॥१॥
जोराच्या - वेगाच्या युद्धांत निष्णात, प्रख्यात, शहाण्या अशा त्र्यंबक भास्करास शिवाजीनें लगेच प्रभावली प्रांताचा अधिकारी नेमलें. ॥२॥
क्रोधानें राजापूरची संपत्ति हरण करणार्‍या व बलानें शृंगारपूर जिंकणार्‍या त्या शिवाजीस शत्रूकडील शेंअक्डों शरणेच्छु श्रेष्ठ सैनिक प्रणाम करूं लागले. ॥३॥
मग त्या नगराच्या ( शृंगारपूरच्या ) रक्षणासाठीं जवळच असलेला प्रख्यात गड क्षणभर पाहून त्यानें त्याचें ‘ प्रतीतगड ’ असें नांव ठेविलें. ॥४॥
चंद्र, कमळतंतु, चांदणें, दंव, चंदन, चांपा इत्यादीच्यायोगें आनंद देऊन अत्यंत सुखावह अशा ग्रीष्म ऋतूनें त्याची सेवा केली. ॥५॥
आश्रयास असलेल्या बकुळी व पाडळी यांच्या फुलांच्या बाणांचा भाता धारण करणार्‍या व ज्याचे बाण जगास जिंकणारे आहेत अशा कोमल मदनानेंसुद्धां शिवाजीचें मन हरण केलें नाहीं ( तो मदनवश झाला नाहीं ). ॥६॥
ग्रीष्म ऋतु आला असतां अतिशय तापणांच्या सूर्याच्या योगें कोमट झालेल्या पाण्यच्या खालीं नद्यांत चांगलें शीतळ पाणी होतें ( व ) जनांवरें त्या आश्रयावर तेथें होतीं. ॥७॥
अतिशय कडक ऊन्ह असणार्‍या ग्रीष्म ऋतूनें प्रत्येक दिवशीं तलावांतील पाणी आटवून टाकल्यामुळें ( कमी कमी केल्यामुळें ) सारसपक्षीं चिखलांत बसूं लागले आणि मासे व कांसवें यांचे थवेच्या थवे मरूं लागले. ॥८॥
फुललेल्या शिरीष व पाडळी यांच्या छताच्या सुगंधानें सुगंधित झालेल्या वायूच्यायोगें विरक्त व विद्वान लोकांच्या मनाससुद्धां कामज्वराची बाधा झाली ! ॥९॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी फक्त दोन गोष्टी वापरा

पोर्टफोलिओ डाएट हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे, फायदे जाणून घ्या

तरुण मुलांना वयस्कर महिला का आवडतात? कारणे जाणून घ्या

नैतिक कथा : रागीट पोपटची गोष्ट

Gajar Kofte या हिवाळ्यात चवदार गाजर कोफ्ते बनवा; खूप सोपी विधी

पुढील लेख
Show comments