suvichar

खबरदार ! आता मात्र 'या' कठोर निर्णयासाठी तयार राहा

Webdunia
बुधवार, 31 मार्च 2021 (23:16 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या 'लॉकडाऊन' लागू करण्याची मागणी करणारा एक, तर 'लॉकडाऊन नकोच' असे म्हणणारे दोन गट राज्यात निर्माण झाले आहेत. पण अपरिहार्यता म्हणून आता सरकारला काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकारचा लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा सुरू असते. पण आता करोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादणार आहे, ही पावले उचलावीच लागणार आहेत, त्यामुळे लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी,' असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.  राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. संपूर्ण लॉकडाऊन न करता करोनाचा संसर्ग कसा थोपवता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आता कठोर निर्बंधांचा मार्ग अवलंबले जाणार आहे.
 
राजेश टोपे म्हणाले, 'गर्दी टाळणे हाच आमचा निर्बंध लावण्यामागचा मुख्य हेतू आहे. गर्दी कशी टाळता येईल. गर्दीच्या ठिकाणांवर कसे नियंत्रण ठेवता येईल, याबाबतचं नियोजन केलं जात आहे. हे नियोजन अंतिम झाल्यावर त्याबाबतची माहिती देण्यात येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात ७/१२ रेकॉर्ड घोटाळा उघडकीस, लाखो शेतकरी प्रभावित म्हणाले- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पश्चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यावर रहस्यमय ड्रोन जप्त

LIVE: अहिल्यानगरमध्ये १२ वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित

एसटी ताफ्यात ८,३०० नवीन बसेसची भर पडणार; तोट्यातून सावरण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांची नवी योजना

LIVE: बायखळा तुरुंगातील कैद्यांवर अन्नटंचाईचे संकट

पुढील लेख