Dharma Sangrah

गुगल सर्चवर करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा नवा पर्याय

Webdunia
बुधवार, 17 जून 2020 (19:50 IST)
आता गुगलने जवळच्या करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा एक नवा पर्याय गुगल सर्चवर उपलब्ध करुन दिला आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
 
“जवळचे अधिकृत कोविड १९ चाचणी केंद्र शोधण्याची सर्वात सोपी पद्धत पुढीलप्रमाणे. शोधा इंग्रजी, हिंदी आणि सात प्रादेशिक भाषांमध्ये. फक्त गुगल करा,” अशा कॅफ्शनसहीत @PIBMumbai या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये गुगलच्या मदतीने कशापद्धतीने जवळचं करोना चाचणी केंद्र शोधता येईल यासंदर्भातील माहिती तीन मुद्द्यांसहीत देण्यात आली आहे.
 
कसे शोधाल जवळचं करोना चाचणी केंद्र?
 
१) गुगलवर ‘Coronavirus Testing’ किंवा ‘COVID Testing’ या टर्म सर्च करा.
 
२) हा सर्च रिझल्ट दाखवताना तुम्हाला टेस्टींग नावाचा एक टॅब दिसेल. यामध्ये तुमच्या जवळच्या करोना चाचणी केंद्रांची माहिती आणि इतर महत्वाच्या टीप्स दिलेल्या असतील.
 
३) या केंद्रांना भेट देण्याआधी भारत सरकराने सुरु केलेल्या 1075 या हेल्प लाइन क्रमांकावर कॉल करा आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन जवळ घेऊन जा.
 
४) ही सेवा इंग्रजी, हिंदीबरोबरच सात भारतीय प्रदेशिक भाषांमध्ये आहे. यात मराठी, बंगाली, तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती भाषेचा समावेश आहे.
 
जवळचे अधिकृत #COVID19 चाचणी केंद्र शोधण्याची सर्वात सोपी पद्धत पुढीलप्रमाणे. शोधा इंग्रजी, हिंदी आणि 7 प्रादेशिक भाषांमध्ये. फक्त #Google करा.
 
जाण्यापूर्वी 1⃣0⃣7⃣5⃣ वर कॉल करा व डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शन पेपर घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

MI vs SRH: सनरायझर्स हैदराबाद मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ गडी राखून विजयी

Legislative Council Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

लाडकी बहीण योजना: या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी आजची अंतिम मुदत; लाभार्थी महिलांनी अद्याप पडताळणी केलेली नाही, त्यांचे पुढील हप्ते थांबू शकतात

नितेश राणे यांचा अमरावती दौरा रद्द, अचलपूरमध्ये समर्थक बैठकीविनाच परतले; दुकाने बंद केल्याने व्यापारी संतप्त

LIVE: महाराष्ट्रात 'एक राष्ट्र, एक ई-चलन' योजना लागू, वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर

पुढील लेख
Show comments