Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना लस : डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन 65.2% परिणामकारक, भारत बायोटेकचा दावा

Corona vaccine: Kovacin 65.2% effective on Delta variant
Webdunia
शनिवार, 3 जुलै 2021 (22:52 IST)
कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्सच्या आकडेवारीची विश्लेषण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं या लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने जाहीर केलंय. डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन 65.2% परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केलाय.
 
SARS - CoV2 च्या B.1.617.2 म्हणजेच डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन लस 65.2% परिणामकारक आढळली असल्याचं भारत बायोटेकने जाहीर केलेल्या 'प्री - प्रिंट डेटा'मध्ये म्हटलंय.
 
याचा अर्थ कंपनीने प्रसिद्ध केलेल्या या संशोधन निष्कर्षांचा आढावा (Peer Review) अजून जगातल्या इतर संशोधकांनी घेतलेला नाही.
 
18 ते 98 वयोगटातल्या 25,800 लोकांवर या चाचण्या घेण्यात आल्या. देशभरात 25 ठिकाणी या चाचण्या घेण्यात आल्या.
 
भारत बायोटेकच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निकाल
 
* असिम्प्टमॅटिक (लक्षणं न दिसणाऱ्या) कोव्हिडपासून 63% संरक्षण.
 
* सिम्प्टमॅटिक म्हणजे लक्षण आढळणाऱ्या सौम्य आणि मध्यम संसर्गापासून 78% संरक्षण.
 
* गंभीर कोरोना संसर्ग होण्यापासून आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्यापासून 93% संरक्षण.
 
*B.1.617.2 म्हणजेच डेल्टा व्हेरियंटपासून 65.2% संरक्षण.
 
 
कोव्हॅक्सिन काय आहे?
कोव्हॅक्सिन एक इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे म्हणजे यात मृत कोरोना व्हायरस वापरला आहे. ही लस शरीरात गेली तर कोरोना व्हायरसला संपवू शकते, पण त्याने काही धोका होत नाही.
 
ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. भारत बायोटेकला गेल्या 24 वर्षांचा अनुभव आहे. या काळात त्यांनी 16 लशी बनवल्या आहेत आणि 123 देशांमध्ये निर्यात केल्या आहेत.
 
भारत बायोटेकने ही लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना व्हायरसचं सॅम्पल वापरलं होतं.
 
ही लस दिल्यानंतर शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्ती मेलेल्या कोरोना व्हायरसची रचना ओळखू शकते. याने रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना व्हायरस कसा आहे हे समजतं ज्यायोगे त्याच्याशी लढता येतं.
 
28 दिवसांच्या अंतराने या लशीचे 2 डोस घ्यावे लागतात.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पुणे बस दुष्कर्म प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला

LIVE: मंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला

National Safety Day 2025 राष्ट्रीय सुरक्षा दिवस निबंध

धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारला

औरंगजेबावर वक्तव्य करणारे अबू आझमी कोण आहे? महाराष्ट्रात एफआयआर दाखल

पुढील लेख