rashifal-2026

राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, तर 31,855 नवे कोरोना रुग्ण दाखल

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (07:51 IST)
राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. देशात नव्या स्ट्रेनचे एकूण 771 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र, केरळ व तेलंगणा राज्यात हे रुग्ण अधिक आहेत. काही रुग्णांमध्ये युकेचा तर, काही रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन आढळून आला आहे. बुधवारी राज्यात तब्बल 31 हजार 855 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 22 लाख 62 हजार 593 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर  13 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
 
सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 2 लाख 47 हजार 299 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना मृतांची संख्या 53 हजार 684 एवढी झाली असून, तर 95 जणांनी आपला जीव गमावला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.09 टक्के एवढा झाला आहे.
 
राज्यात सध्या 12 लाख 68 हजार 094 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 13 हजार 499 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. देशात 10 जिल्ह्यात नव्यानं वाढ होणा-या कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यापैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अकोला व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला! 12 आणि 13 नोव्हेंबरला थंडीच्या लाटेचा इशारा

LIVE: वणीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकतेची झलक; एकत्र महापालिका निवडणुका लढवणार

फडणवीस मंत्रिमंडळाने घेतले मोठे निर्णय, ग्रामीण जिल्हा बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ₹827 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीला मान्यता

सिलिगुडीमध्ये रिचा घोषच्या नावाने एक स्टेडियम बांधले जाईल, ममता बॅनर्जी यांनी केली घोषणा

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पत्नी शाहजीनने एसआयटी चौकशीची मागणी केली

पुढील लेख
Show comments