Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिकन बद्दल अफवा पोलिसानी सुरू केली कारवाई

Webdunia
बुधवार, 18 मार्च 2020 (09:52 IST)
कुक्कुट उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येत असून अशा अफवांविषयी नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.
 
श्री.केदार म्हणाले, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल मीडिया उदा. फेसबुक, व्हॉट्सॲपवर, युट्युबवर कुक्कुट मांस व इतर उत्पादने यांच्या आहारातील समावेशाबाबत विविध अशास्त्रीय बाबी पसरवल्या जात आहेत. अशा अफवांमुळे कुक्‍कुट खाद्य निर्मिती व कुक्कुट पालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. या उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो हे पूर्णतः अशास्त्रीय व निराधार आहे, असे  त्यांनी सांगितले.
 
चिकन अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होतो, अशी व्हिडिओद्वारे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकाला आंध्रप्रदेशातून तर दुसऱ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. अफवा पसविणाऱ्यांचा शोध सुरु असून त्यांच्यावरही गंभीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे पोल्ट्री व्यवसाया करणाऱ्या शेतकऱ्यांना  दिलासा मिळाला आहे, असे श्री.केदार यांनी सांगितले.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments