Dharma Sangrah

लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू

Webdunia
दिवाळीच्या शुभ प्रसंगी महालक्ष्मी पूजनाचे विधान आहे. या दिवशी घर आणि देवघर सजवण्यासाठी मंगळ वस्तू वापरल्या जातात. जाणून घ्या गृह सुंदरता, समृ‍द्धी आणि दिवाळी पूजनात कोणते 8 शुभ प्रतीक आहेत ते:
 
दिवा
दिवाळी पूजनात दिव्याचे अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनात केवळ मातीच्या दिव्यांचे महत्त्व आहे. पाच तत्त्व माती, आकाश, जल, अग्नी आणि वायू. म्हणून प्रत्येक विधीत पंचतत्त्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. काही लोकं पारंपरिक दिवे न लावता मेणबत्ती किंवा इलेक्ट्रिक दिवे लावतात, असे करणे योग्य नाही.
 
रांगोळी
सण- उत्सव आणि अनेक मांगलिक प्रसंगी रांगोळी काढल्याने घर-अंगण सुंदर दिसतं आणि याने घरात सकारात्मकता राहते. अशी सजावट समृद्धीचे दार उघडते.  
 
कवड्या
पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीच्या प्रतीक मानल्या गेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी चांदी आणि तांब्याचे शिक्के यासह कवड्या पूजन देखील महत्त्वाचे आहे. पूजनानंतर एक-एक पिवळी कवडी वेगवेगळ्या लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरी किंवा खिशात ठेवल्याने धन समृद्धी वाढते.
 
तांब्याचा शिक्का
तांब्यात सात्त्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा अधिक असते. कलशामध्ये असणार्‍या लहरी वातावरण प्रवेश करतात. कलशामध्ये तांब्याचा शिक्का टाकल्याने घरात शांती आणि समृद्धीचे दार उघडतील.
 
मंगल कलश
जमिनीवर कुंकाने अष्टदल कमळ आकृती बनवून त्यावर कलश ठेवलेला असतो. पाण्याने भरलेल्या कांस्य, तांबा, रजत किंवा स्वर्ण कलशात आंब्याचे पान टाकून त्यावर नारळ ठेवलेलं असतं. कलशावर कुंकू, स्वस्तिक चिन्ह आणि त्यावर लाल दोरा बांधलेला असतो.
 
श्रीयंत्र
धन आणि वैभवाचे प्रतीक आहे लक्ष्मी श्रीयंत्र. हे अत्यंत प्रसिद्ध व प्राचीन यंत्र आहे. श्रीयंत्र धनागमासाठी आवश्यक आहे. श्रीयंत्र यश आणि धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शक्तिशाली यंत्र आहे. दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्र पूजा करणे शुभ असतं.
 
फुल
कमळ आणि  झेंडूचे फुलं : कमळ आणि झेंडूचे फुलं शांती, समृद्धी आणि मुक्ती चे प्रतीक मानले गेले आहे. पूजा व्यतिरिक्त घराच्या सजावटीसाठी झेंडूचे फुलं आवश्यक आहे. घराची सुंदरता, शांती आणि समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
 
नैवेद्य
लक्ष्मीला नैवद्यात फळं, मिष्टान्न, मेवे आणि पेठे या व्यतिरिक्त लाह्या, बत्ताशे, चिरंजी, शंकरपाळे, करंजी व इतर फराळाचा नैवेद्य लावावा. हे गोड पदार्थ आमच्या जीवनात गोडवा घोळतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भक्तीत अहंकार कसा प्रवेश करतो, अहंभाव पासून वाचण्याचे सोपे उपाय

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

शुक्रवार आपल्यासाठी ठरेल शुभ, कशा प्रकारे हे जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments