हिंदू पंचांगानुसार या वर्षी दसरा म्हणजेच विजयादशमी सण 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. दसरा दिवाळीच्या 20 दिवसांपूर्वी साजरा केला जातो. दसरा सर्व सिद्धिदायक तिथी असल्याचे मानले जाते. दसरा हा साडेतीन शुभ मुर्हूतांपैकी आहे. अर्थात या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते. या दिवशी सर्व शुभ कार्य फल प्रदान करणारे असल्याचे म्हणतात.
ज्योतिष शास्त्रानुसार दसर्याला मुलांचे अक्षर लेखन, घर किंवा दुकानाचे निर्माण, गृह प्रवेश, मुंज, बारसं, उष्टावण, कर्ण छेदन, यज्ञोपवीत संस्कार आणि भूमी पूजन इतर कार्य करणे शुभ मानले गेले आहे. विजयादशमीच्या दिवशी विवाह संस्काराला मनाई आहे.
या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजून 58 मिनिटापर्यंत अष्टमी आहे नंतर नवमी लागत आहे. ज्यामुळे दसरा 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
शुभ मुहूर्त-
दशमी तिथी प्रारंभ - 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 07:41 मिनिटापासून
विजय मुहूर्त - दुपारी 01:55 मिनिटे ते 02:40 मिनिटापर्यंत
अपराह्न पूजा मुहूर्त - 01:11 मिनिटे ते 03:24 मिनिटापर्यंत
दशमी तिथी समाप्त - 26 ऑक्टोबर सकाळी 08:59 मिनिटापर्यंत असेल.