Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vijayadashami 2024 विजयादशमी कधी आहे? या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्र पूजन कसे करावे?

Webdunia
शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 (00:05 IST)
विजयादशमी सण रावण दहन, अपराजिता देवी पूजा, देवी विसर्जन, आयुध पूजा, सरस्वती पूजा, शमी पूजा आणि दसरा मिलन यासाठी खास महत्त्वाचा दिवस आहे.
 
उदयातिथीप्रमाणे 12 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
शस्त्र पूजा विजयी मुहूर्त आणि पूजन विधी जाणून घ्या
 
दसरा आयुध पूजा विजय मुहूर्त- दुपारी 02:03 ते 02:49 दरम्यान
12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी पूजा शुभ मुहूर्त:-
सकाळी नवमी पूजा: सकाळी 05:06 ते 06:20 दरम्यान
अभिजीत मुहूर्त: दुपारी 11:45 ते 12:32 दरम्यान
संध्याकाळची पूजा: संध्याकाळी 05:54 ते 07:09 दरम्यान
रात्री पूजा: अमृत काल 06:28 ते 08:15 दरम्यान
 
सरस्वती पूजन आणि शस्त्र पूजन
विजयादशमीच्या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्र पूजन करण्याची परंपरा आहे. हे पूजन ज्ञान, कला आणि शस्त्रांच्या शक्तीचे प्रतीक आहे.
 
सरस्वती पूजन
पूजा साहित्य
हळद, कुमकुम, अक्षता, निरांजन, 2 नारळ, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, फुले, आपट्याची पाने, सरस्वती रुपात पुस्तके आणि चित्रे, 2 सुपार्‍या, 2 विड्याची पाने, देवीचा फोटो किंवा मूती
 
शुद्ध मनाने स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
पूजा स्थळ सजवा आणि लाकडी पाटावर किंवा चौरंगावर सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
विधिवत पूजन सामग्री जसे की धूप, दीप, फुले, नैवेद्य, चंदन इतर घ्या.
वक्रतुंड स्तोत्र म्हणा.
 
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।। तृतीयं कृष्णपिगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं तु गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।
इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।
 
मूर्तीला हार घाला.
नंतर विड्यावर, नारळावर, पुस्तकांवर आणि वाद्ययंत्रांवर हळद-कुंकू व अक्षता वाहावे.
श्लोक म्हणा: शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।
 
नंतर या कुन्देन्दुतुषारहारधवला प्रार्थना म्हणत फूले व आपट्याची पाने अर्पण करा.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता । सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
निरांजन ओवाळून व गुळ-खोबर्‍याचा किंवा इतर मिठाईचा नैवेद्य अर्पण करा.
श्री राम जय राम जय जय राम विजयमंत्र म्हणा
विद्यार्थी वर्गासाठी हा दिवस विशेष असतो. ते सरस्वती मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी पूजा करतात.
 
शस्त्र पूजन
शस्त्रे स्वच्छ करून त्यांना एका स्वच्छ आसनावर ठेवा.
सरस्वती पूजनाप्रमाणेच धूप, दीप, फुले, नैवेद्य इतर साहित्याने पूजन करा.
शस्त्रांचे आशीर्वाद घ्या आणि त्यांचे महत्त्व समजून घ्या.
 
रावण दहन
दसरा हा भारतातील एक प्रमुख सण आहे. हा सण राक्षस राजा रावणावर श्रीरामचंद्राने विजय मिळवलेल्या दिवशी साजरा केला जातो.
रात्रीच्या वेळी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे बनवून त्यांचे दहन केले जाते.
हे दहन बुराईवर चांगल्याचा विजय दर्शवते.
 
घोड्याची किंवा वाहनांची पूजा
या दिवशी वाहनांची तसेच घोड्याची पूजा करण्याचीही परंपरा आहे.
 
काही महत्त्वाच्या गोष्टी:
विजयादशमीच्या दिवशी नवीन कपडे घालण्याची परंपरा आहे.
या दिवशी कुटुंबासह मिळून भोजन केले जाते.
या दिवशी मोठ्यांनी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.
दसरा हा एक सकारात्मक विचारांचा सण आहे. या दिवशी आपण बुराईवर विजय मिळवण्याचे संकल्प करतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

गुरुप्रतिपदा का साजरी करतात?

श्री नृसिंह सरस्वती अष्टक Shri Nrusingh Sarswati Ashtak

Holika Dahan 2025 होलिका दहन कधी आहे? तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

श्री नृसिंह सरस्वती आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

पुढील लेख
Show comments