suvichar

महाशिवरात्रीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल, तर या ३ सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Webdunia
बुधवार, 11 फेब्रुवारी 2026 (11:42 IST)
महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल, तर या ३ सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा.
 

इन्स्टंट साबुदाणा थालीपीठ

साहित्य-
२ कप भिजवलेला साबुदाणा
२ उकडलेले बटाटे
अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
३-४ हिरव्या मिरच्या
जिरं
चवीनुसार मीठ (सैंधव मीठ
कोथिंबीर
तूप
 
कृती-
सर्वात आधी एका परातीत साबुदाणा, किसलेले बटाटे, दाण्याचा कूट, मिरची, जिरं, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करा. आता पाण्याचा हात लावून मऊ गोळा मळून घ्या.  प्लॅस्टिक पेपर किंवा ओल्या सुती कापडावर छोटे गोळे घेऊन थालीपीठ थापून घ्या. तव्यावर थोडे तूप सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस आणि कुरकुरीत भाजून घ्या.
 

रताळ्याचा गोड शिरा 

रताळे हे उपवासासाठी अतिशय आरोग्यदायी मानले जातात.
साहित्य-
२ मोठी रताळी
अर्धा कप साखर किंवा गुळ 
अर्धा कप दूध
२ चमचे साजूक तूप
वेलची पूड
काजू-बदामाचे काप
 
कृती-
सर्वात आधी रताळी उकडून, सोलून आणि नीट मॅश करून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात रताळ्याचा गर ५-७ मिनिटे परता. त्यात दूध आणि साखर घालून नीट मिक्स करा.  मिश्रण दाट झाले की त्यात वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स घालून गरम सर्व्ह करा.
 

कुरकुरीत वरईचे डोसे 

जर तुम्हाला काहीतरी हलकं खायचं असेल, तर भगरचे डोसे उत्तम लागतात.
साहित्य-
१ कप भगर (वरई)
पाव कप साबुदाणा
२ हिरव्या मिरच्या
दही
मीठ
तेल
 
कृती-
सर्वात आधी भगर आणि साबुदाणा २-३ तास भिजत ठेवा. मिक्सरमधून भगर, साबुदाणा, मिरची आणि थोडे दही घालून बारीक वाटून घ्या. पिठात मीठ घालून डोसा बॅटरसारखे पातळ करा. नॉन-स्टिक तव्यावर डोसे सोडा आणि बाजूने थोडे तेल सोडून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: महाशिवरात्र उपवासाला बनवा स्वादिष्ट राजगिरा पराठा रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: महाशिवरात्रीला बनवा दोन प्रकारच्या थंडाई

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीजशिवाय पाणी थंड ठेवण्याचे रामबाण उपाय

सुगंधी 'आलू दम पुलाव' रेसिपी; चवीला अतिशय उत्कृष्ट आणि बनवायला अगदी सोपी

World Book Day 2026 जागतिक पुस्तक दिन : डिजिटल युगात पुस्तकांचं महत्त्व

उन्हाळ्यात आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

POWERGRID Recruitment 2026 : पॉवरग्रीडमध्ये ६६० पदांसाठी भरती, अर्जसुरु

पुढील लेख
Show comments