Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उरूग्वेने रशियाला हरविले

Webdunia
मंगळवार, 26 जून 2018 (11:00 IST)
रशियात खेळल जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 'अ' गटाच्या साखळी सामन्यात उरूग्वेने यजमान रशिाचा 3-0 असा पराभव केला.
 
या विजयासाह उरूग्वेने 'अ' गटात पहिले स्थान घेतले आहे. पहिल्या सामन्यात उरूग्वेने इजिप्तचा पराभव केला होता. दुसर्‍या सामन्यात त्यांनी सौदी अरेबियाला नमविले होते. सोमवारी रशियाला नमवून उरूग्वेने 'अ' गटातील तिन्ही साखळी सामने जिंकून नऊ गुणांसह आघाडी घेतली आहे.
 
यजमान रशियाने सौदी अरेबियाला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी इजिप्तचाही पराभव करून पुढची फेरी निश्चित केली होती. काल त्यांचा पराभव झाला तरीही रशियाने सहा गुणांसह याच गटातून दुसरे स्थान मिळविले आहे. दोन्ही संघांनी पुढची बाद फेरी गाठली आहे.
 
सोवारी या दोन्ही संघामध्ये खेळले गेलेल्या साखळी लढतीत लुईस सुआरेजने फ्री किकवर गोल केला. त्यानंतर डेनिस चेरीशेव्ह याने रशियाकडून आत्मघाती स्वयंम गोल केला. 90 व्या मिनिटास कबानीने तिसरा गोल करून उरूग्वेला 3-0 असा विजय मिळवून दिला. यजमान रशियाचा साखळी सामन्यातील हा पहिला पराभव ठरला.
 
उरूग्वेने मात्र एकही सामना गामवलेला नाही. दीएगो लेक्सॉल्ट याचा फटका रशियाच्या चेरीशेव्हला लागून जाळीत गेला. त्यामुळे हा स्वयंम गोल ठरला. एवढ्यावरच भागले नाही रशियाच्या अडचणी आणखी वाढल्या. रशियाचा खेळाडू इगोर स्मोलनिकोव्ह याला 36व्या मिनिटास पिवळे कार्ड दाखविण्यात आले व त्याला मैदानाबाहेर जावे लागले. रशियाला उर्वरित वेळेत दहा खेळाडूंवर खेळावे लागले. सुआरेजने दहाव्या  मिनिटाला पहिला गोल केला व 26 व्या मिनिटाला दुसरा गोल झाला.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments