Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आवळा नवमी संपूर्ण माहिती

Webdunia
गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (10:41 IST)
आवळा नवमी कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. आवळा नवमीला अक्षय नवमी देखील म्हणतात. आवळा नवमीची पूजा केल्याने भक्तांना अक्षय फळ प्राप्ती होते.
 
शास्त्रांप्रमाणे अक्षय नवमीच्या दिवशी केलेलं पुण्य जन्म-जन्मान्तर पर्यंत अक्षय राहतं. या दिवशी केलेले शुभ कार्य जसे दान, पूजा, भक्ती, सेवा इतर कार्यांचे पुण्य अनेक जन्मांपर्यंत मिळतं राहतं.
 
आवळा नवमीची पूजा उत्तर भारतात प्रमुखतेने केली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली जेवण तयार केलं जातं आणि कुटुंबासह भोजन ग्रहण केलं जातं. स्त्रिया या पूजेत मुलांच्या आरोग्य आणि आनंदाची प्रार्थना करतात. जाणून घ्या पूजा विधी आणि कथा-
 
 
आवळा नवमीला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आणि आवळ्याच्या झाडाखाली जेवण तयार करण्याची परंपरा का सुरु झाली यामागील एक कथा या प्रकारे आहे-
 
एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत होत्या. रस्त्यात त्यांनी भगवान विष्णु आणि शिव यांची एकत्र पूजा करण्याची इच्छा धरली. लक्ष्मी आईने विचार केला की विष्णु आणि शिव यांची एकत्र पूजा कशा प्रकारे करता येईल अशात त्यांना जाणीव झाली की तुळस आणि बेल यांचे गुण एकत्र आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे तर शिवाला बेल पत्र.
 
देवी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाला विष्णु आणि शिवाचे प्रतीक जाणून आवळ्याच्या झाडाची पूजा केली. पूजेने प्रसन्न भगवान विष्णु आणि शिव स्वयं प्रकट झाले. लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाखाली जेवण तयार केलं आणि श्री विष्णु आणि भगवान शिव यांना जेवायला वाढलं. नंतर त्यांनी ही प्रसाद रुपी भोजन ग्रहण केलं. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती. म्हणून ही परंपरा सुरु झाली.
 
आंवला नवमी पूजा विधी
आवळा नवमीच्या दिवशी महिलांनी सकाळी स्नान करावे आणि जवळ असलेल्या एखाद्या आवळ्याच्या झाडाजवळ जावे आणि पूजेची जागा स्वच्छ करावी.
यानंतर आवळ्याच्या झाडाखाली पूर्व दिशेला उभे राहून पाणी आणि दूध अर्पित करावे.
यानंतर पूजा करुन झाडाच्या चारीबाजूला कापूस गुंडाळावा आणि प्रदक्षिणा घालावी.
शेवटी आवळ्याच्या झाडाची आरती करावी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

महादेव आरती संग्रह

Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष

रविवारी करा आरती सूर्याची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments