तीक्ष्ण बुद्धी आणि एकाग्रता मिळविण्यासाठी श्री सरस्वती कवचमचा पाठ करा
सकाळी आंघोळीच्या नित्यक्रमातून निवृत्त झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे. पूजेसाठी पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
पूजेच्या ठिकाणी देवी सरस्वती आणि गणपतीच्या मूर्तीसमोर दिवा लावावा. नंतर गणेशाची पूजा करावी. त्यानंतर देवी सरस्वतीची पूजा करुन नैवेद्य दाखवावा.
पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसून श्री सरस्वती कवचम् पाठ करावा.
श्री सरस्वती कवचम पठणाचे महत्व
श्री सरस्वती कवचमचे नियमित पठण केल्याने साधकाला देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो. देवी त्याच्यावर प्रसन्न होते आणि इच्छित फळ देते. सरस्वती कवचम् पाठ करून माणसाला ज्ञान मिळते, आरोग्य मिळते, दीर्घायुष्य मिळते. साधकाची कीर्ती वाढते. संपत्तीत वाढ होते आणि समृद्धी प्राप्त होते. वंशवुद्धी होते.