Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dev Uthani Ekadashi 2022 तुळसला अर्पित करा एकमेव वस्तू, भराभराटी येईल

Webdunia
गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (23:02 IST)
Dev Uthani Ekadashi 2022 : 4 नोव्हेंबर 2022 रोजी एकादशी येणार आहे. या दिवशी शालिग्रामजींसोबत तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि तुळशी विवाहही केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या पूजेच्या वेळी आमच्याद्वारे सांगितलेल्या काही गोष्टींपैकी एकच अर्पण केल्यास तुमच्या धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला माता तुळशी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल.
 
1. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' म्हणताना तुळशीमातेला कच्च्या दुधाचे काही थेंब अर्पण करा. यामुळे तुळशी माता प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल.
 
2. तुळशीच्या रोपासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख-शांती राहते.
 
3. शाळीग्राम दगड तुळशीच्या रोपाजवळ ठेवावा. जर तुम्ही ठेवला नसेल तर ठेवा.
 
4. तुळशीला पांढरी, निळी किंवा चमकदार चुनरी अर्पण करावी. चुनरी अर्पण करताना हा मंत्र म्हणा- 'महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।
 
5. सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून आपल्या शरीराच्या लांबीइतका एक पिवळा धागा कापून त्यात 108 गाठी बांधा आणि तुळशीच्या रोपाखाली बांधा. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हा धागा काढून पाण्यात टाका.
 
6. देव उठनी एकादशीच्या दिवशी तुळशीला एकच गोष्ट बांधावी, लाल धागा किंवा छोटी लाल चुंरी बांधावी. माँ तुळशीसोबतच माता लक्ष्मीची कृपाही मिळते.

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments