Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीमद्भगवद्गीता : यात दडलेले आहे जीवनाचे सारं, त्याचे काही अंश जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (14:59 IST)
श्रीमदभगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर अर्जुनाला उपदेश दिला आहे. गीतेमध्ये दिलेले उपदेश माणसाला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात. 
 
गीताचे उपदेश आपल्याला धर्माच्या मार्गावर चालणे तसेच चांगले कर्म करण्यास शिकवते. महाभारतातील रणांगणाच्या मैदानात उभारलेले अर्जुन आणि श्रीकृष्णामधील संवादापासून प्रत्येक माणसाला प्रेरणा घेतली पाहिजे. चला जाणून घेऊया बद्दलची माहिती.
 
जेव्हा अर्जुन रणांगणात जातात तेव्हा आपल्या समोर आपल्या पणजोबा आणि इतर नातेवाइकांना बघून विचलित होतात. तेव्हा भगवान श्रीकृष्णा त्यांचे योग्य मार्गदर्शन करतात आणि शिकवणी देतात आणि म्हणतात - 'हे पार्थ हा युद्ध धर्म आणि अधर्माच्या मध्ये आहे म्हणून आपले शस्त्र उचला आणि धर्माची स्थापना करा. भगवान श्रीकृष्ण धर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण देतात. माणसाला देखील धर्माचे अनुसरणं करायला पाहिजे.
 
गीतेमध्ये सांगितले आहेत की संतापामुळे संभ्रम निर्माण होतात ज्यामुळे बुद्धी अस्वस्थ होते. भ्रमिष्ट आणि गोंधळलेला माणूस आपल्या मार्गावरून भटकतो. तेव्हा सर्व युक्तिवाद संपतात, ज्यामुळे माणसाचे पतन होतं. म्हणून आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे.
 
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहेत की माणसाला त्याचा केलेल्या कर्मानुसारच फळ मिळतात. म्हणून माणसाला नेहमी सत्कर्म केले पाहिजे. गीतेमध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक मनुष्याने आयुष्यात आत्मसात केल्या पाहिजेत.
 
भगवान श्रीकृष्णा म्हणतात की आत्ममंथन करून स्वतःला ओळखा कारण जेव्हा स्वतःला ओळखाल तेव्हाच तुम्ही तुमच्या क्षमतेचे मूल्यांकन करू शकाल. ज्ञान रुपी तलवारीने अज्ञानता कापून वेगळी करावी. ज्यावेळी माणूस आपल्या क्षमतेचे मूल्यांकन करतो तेव्हाच त्याची सुटका होते.
 
भगवान श्री कृष्ण म्हणतात की मृत्यू एक पूर्ण सत्य आहे, पण हे शरीर नश्वर आहे. आत्मा अजर, अमर आहे, आत्म्याला कोणी ही कापू शकत नाही, पेटवू शकत नाही आणि पाणी देखील भिजवू शकत नाही. ज्या प्रकारे एक कापड काढून दुसरे घातले जाते. त्याच प्रकारे आत्मा एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या जीवात प्रवेश करते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

somvar mahadev mantra jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची

महादेव आरती संग्रह

Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष

रविवारी करा आरती सूर्याची

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments