Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
तुकाराम गाथा - अभंग संग्रह २०१ ते २५०
Webdunia
गुरूवार, 1 एप्रिल 2021 (13:17 IST)
विटूदांडू - अभंग १
२०१
माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥
एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥
पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥
एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥
तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥
॥१॥
२०२
पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥
करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥
आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥२॥
एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥
२०३
पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥१॥
धांव रे हरी सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ध्रु.॥
अवचितां जाळ येतां देखियेला वरी । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥२॥
सभोंवता फेर रीग न पुरे पळतां । तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥३॥
२०४
भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥
बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी ते ॥ध्रु.॥
पसरूनि मुख विश्वरूप खाय जाळ । सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥३॥
२०५
नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥१॥
चला रे याच्या पायां लागों आतां । राखिलें जळतां महा आगीपासूनि ॥ध्रु.॥
कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही कां रे करितां नवल । आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥३॥
२०६
त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तो चि देईल तें खावें ॥१॥
न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हा चि निर्धार त्याला ॥ध्रु.॥
कान्होबा तू जेवीं घासोघासीं म्हणती । आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥
तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥३॥
२०७
घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडीं दुरी । असेल तें तयापें ॥१॥
येथें द्यावें तैसें घ्यावे । थोडें परी निरें व्हावें । सांगतों हे ठावें । असों द्या रे सकळां ॥ध्रु.॥
माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥२॥
तुका म्हणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पायां वेगळें ॥३॥
२०८
काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥
लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥
उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडे । जोडुनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥२॥
तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥३॥
२०९
गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों ।
एक म्हणती उगे रे उगे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥१॥
जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे ।
एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसें । पोटीचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ध्रु.॥
एक म्हणति बहु रे आम्ही पीडिलों माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया ।
तापलों वळितां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥२॥
एक म्हणति तुमचें अरे पोट तें किती । मागों गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति हित्त ।
देव गडी कान्हो आमुचा आम्हां काय हातिं । कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥३॥
एक म्हणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान ।
लागे भवरोग वाहतां खांदीं चवघे जण । हातीं काठ्या डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥४॥
एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर ।
राखोनि राखे आपणा ऐसा कइचा शूर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥५॥
घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसें आम्हासि ठावें ।
चौघांमध्यें बरें दिसेसें तेथें नेमक व्हावें । लपोनि सहज खेळतां भलें गडियासवें ॥६॥
एक म्हणती गडी ते भले मळिती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता ।
नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥७॥
एक म्हणती खेळतां उगीं राहतीं पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें ।
अवघीं येती रागा रे एका म्हणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकीं च खरें ॥८॥
एक म्हणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हें वाउगें तुझे बोल चि खोटे ।
ठायीं राहा उगे ठायीं च कां रे सिणसी वाटे । अवघियांची सिदोरी तुझे भरली मोटे ॥९॥
तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं ।
जागा करूं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥१०॥
२१०
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥
जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥
२११
चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ध्रु.॥
हमामा हुंबरी पांवा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ॥२॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥३॥
पुष्पाचा वरुषाव जाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥४॥
यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनियां मना ॥५॥
२१२
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥
२१३
हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥
वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥
संत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥२॥
तुका म्हणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥३॥
२१४
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥
काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥
उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥२॥
तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥३॥
२१५
जालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥१॥
सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ध्रु.॥
सोडोनियां गांठीं पाहें । काय आहे त्यांत तें ॥२॥
तुका म्हणे जालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥३॥
२१६
या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥
घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥
नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥
तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥३॥
२१७
वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥
घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ध्रु.॥
सांगितलें केलें काम । नव्हे धर्म सत्याचा ॥२॥
तुका म्हणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें॥३॥
२१८
येइल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥
आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥
मज घेती डांगवरी । सवें हरि नसलिया ॥२॥
तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥
२१९
अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥
बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥
बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥
वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥
२२०
धन्य तें गोधन कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥१॥
धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ध्रु.॥
धन्य देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य जालें ॥२॥
धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जालें ॥३॥
धन्य म्हणे तुका जन्मा तींचि आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥४॥
२२१
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥
धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥
तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥२॥
२२२
देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥
जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥
मोठें भावार्थाचें बळ । देव जाला त्याचें बाळ ॥२॥
तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोवाटीं ॥३॥
२२३
हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥१॥
देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ध्रु.॥
धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोट ॥२॥
तुका म्हणे घरीं । मग कैं जी या परी ॥३॥
२२४
अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥
कां रे धरिला अबोला । माझा वांटा देईं मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ध्रु.॥
भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां । गाई सैरा ओढाळा ॥२॥
तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी । घेता जाला सुखी । भीतरी वांटी आणीकां ॥३॥
२२५
आम्ही गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥१॥
सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला ॥ध्रु.॥
खेळों आपआपणांशीं । आमचीं तीं आम्हांपाशीं ॥२॥
मिळालों नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥३॥
२२६
अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना ॥१॥
फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ध्रु.॥
आवडती थोर मोटे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥२॥
तुका म्हणे जाणों भाव । जीविंचा देव बुझावी ॥३॥
मृदंग पाटया - अभंग
२२७
मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥१॥
मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥
गडियां गडी वांटुनि देई । ज्याचा सोडी तेचि ठायीं ॥२॥
अगळ्या बळें करील काय । तुज देणें लागे डोय ॥३॥
नवां घरीं पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥४॥
जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥५॥
सांपडोनि डाईं बहु । काळ गुंतलासी ॥६॥
बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥७॥
चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥८॥
२२८
पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥
जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥
न रिघतां ठाव आम्हा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपा ॥२॥
तुका म्हणे हातां चडे जीवाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥३॥
२२९
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥
खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥
मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्यायें ॥२॥
तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥३॥
२३०
आतां हें चि जेऊं हेंचि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥
हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ध्रु.॥
चवीं चवीं घेऊं घास । ब्रम्हरस आवडी ॥२॥
तुका म्हणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥३॥
२३१
अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥
साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥
थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥
तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥
२३२
तुजसवें येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिला गिरी । चांग तईं वांचलों ॥१॥
मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तो चि आवरा ॥ध्रु.॥
चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आम्ही नाहीं भय धाक या अनंता ॥२॥
खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥३॥
तुका म्हणे उरी नाहीं तुजसवें । शाहाणे या भावें दुरी छंद भोळियां सवें ॥४॥
२३३
नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥१॥
कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ध्रु.॥
न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥२॥
तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणों ॥३॥
२३४
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥
तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥
वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥
तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥३॥
२३५
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥१॥
तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥
आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥३॥
२३६
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥
हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥
भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥३॥
२३७
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥
आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥
चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥
तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥३॥
२३८
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥
जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥२॥
तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
२३९
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥
दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥
रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥२॥
आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥३॥
२४०
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥
योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥
तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥३॥
२४१
धांव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण ही काई ॥१॥
आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ध्रु.॥
मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ॥२॥
तुका म्हणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥३॥
२४२
धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥
ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥
दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥
तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥
२४३
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥
आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥
त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोटा दिसतसे ॥२॥
तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जाती ॥३॥
२४४
उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥१॥
नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥
२४५
संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥
पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥
तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥
२४६
चुंबळीचा करी चुंबळीशीं संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥
बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥
माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥२॥
तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥३॥
२४७
सांपडला संदीं । मग बळिया पडे फंदीं ॥१॥
ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥
दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥
तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥
२४८
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥
आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥
अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥
तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥
२४९
न देखोन कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥१॥
जालों अवघियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥
न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥२॥
खादलें न खातां । रसना रस जाली घेतां ॥३॥
न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥४॥
नाइकिलें कानीं । तुका म्हणे आलें मनीं ॥५॥
ब्रम्हचारी फिर्याद गेला - अभंग २
२५०
काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥
दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥
अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥
दोहीं ठायीं फजीत जालें । पारणें केलें अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥५॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
तुकाराम गाथा - अभंग संग्रह १५१ ते २००
तुकाराम गाथा - अभंग संग्रह १०१ ते १५०
संकष्टी चतुर्थी: संकटांपासून मुक्तीसाठी संकटनाशन गणेश स्तोत्र
Sankashti Chaturthi भालचंद्र संकष्टी चतुर्थी: या प्रकारे करा पूजा
तुकाराम गाथा - अभंग संग्रह ५० ते १००
सर्व पहा
नवीन
Vasubaras Wishes in Marathi वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
Vasubaras Katha वसुबारस कथा
Vasubaras Aarti कामधेनुची आरती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
श्री सूर्याची आरती
सर्व पहा
नक्की वाचा
देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी
दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व
धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?
Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा
पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या
पुढील लेख
तुकाराम गाथा - अभंग संग्रह १५१ ते २००
Show comments