rashifal-2026

श्री संतोषीमाता नमनाष्टक

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (10:53 IST)
जय जयाजी देवी भगवती । भक्तवत्सले कारुण्यमूर्ती ।
अनंत वरदे पावसी संकटी । माते संतोषी नमो नमः ॥१॥
 
जगत्‌कल्याणी अतिसुखदायक । सर्वेश्वरी तू अरिकुलघातक ।
वारिसी समस्त दुःखे विदारक । माते संतोषी नमो नमः ॥२॥
 
नानावतारी सज्जन-रक्षक । मूळपीठस्वामिनी भवभयहारक ।
शक्तिस्वरूपा मुख्य प्रबंधक । माते संतोषी नमो नमः ॥३॥
 
दिव्य तेजस्विनी स्वयंप्रकाशित । गुणवती महत्‌किर्तीवंत ।
नित्य अनादी चराचरी व्याप्त । माते संतोषी नमो नमः ॥४॥
 
अगाध करणी विश्वीं अगोचर । तारिसी भक्ता निजकृपे सत्वर ।
भावे प्रार्थिता धावसी तत्पर । माते संतोषी नमो नमः ॥५॥
 
शरण भुवनत्रय तव चरणांसी । हरि-हर-ब्रह्मा गाती स्तवनासी ।
तुझीया दर्शने सुख संतांसी । माते संतोषी नमो नमः ॥६॥
 
श्रेष्ठ पवित्र चरित्र महती । प्रेमस्वरूपिणी तू यशवंती ।
तव प्रसादे श्री आणि कीर्ती । माते संतोषी नमो नमः ॥७॥
 
थोर महिम्न म्हणूनी सुरगण । असती तुझिया चरणी लीन ।
पुरवी मनोरथ रक्षी निशिदिन । माते संतोषी नमो नमः ॥८॥
 
॥ इति जितेन्द्रनाथ रचित श्रीसंतोषीमाता नमनाष्टक संपूर्ण ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Holi 2026 होळीवर भद्रा आणि चंद्रग्रहणाचे सावट! जाणून घ्या होलिका दहन आणि धुलिवंदनाचा नेमका मुहूर्त

गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणे योग्य आहे का?

शंकराचार्य कसे बनतात? नियम काय आणि सध्या किती शंकराचार्य आहेत?

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

रोहिणी व्रताचे महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments