Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री भक्तविजय अध्याय ११
Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
श्रोते हो ऐका सावधान ॥ तुम्हांसी लाधलें अमृतपान ॥ जे भक्तकथा अद्भुत गहन ॥ प्राकृत होऊनि विकासली ॥१॥
जैसें विप्रांचे घरीं पक्वान्न जाहलें ॥ तें सकळ यातींचे उपयोगीं पडलें ॥ कीं कनकाचे अलंकार केले ॥ सुंदर अंगीं शोभावया ॥२॥
कापुसाचें अंबर विणिलें जाण ॥ तें सकळांसी सीतनिवारण ॥ कीं नवनीत कढवून ठेवितां पूर्ण ॥ न नासेचि सर्वथा ॥३॥
कीं रत्नें कोंदणीं बैसविली ॥ तीं लेणाराचे उपयोगा पडलीं ॥ कीं अमृतबीजें भूमींत पेरिलीं ॥ तीं विस्तारलीं कोटिगुणें ॥४॥
पाषाण फोडून रचिलें देऊळ ॥ त्यांत बैसविला जाश्वनीळ ॥ तैसाचि हा ग्रंथ प्रांजळ ॥ जाहला केवळ सकळिकां ॥५॥
नातरी विकल्प आणूनि चित्तीं ॥ म्हणाल प्रौढी सांगसील किती ॥ तरी मी सलगीनें तुम्हांप्रती ॥ सप्रेममती बोलिलों ॥६॥
मजवरी निमित्त ठेवूनि वायां ॥ नका उपेक्षूं भक्तविजया ॥ दोष टाकूनि गुण घ्यावया ॥ अधिकार तुम्हां आहे कीं ॥७॥
एरवीं महीपति मंदमती ॥ रासनांवें एकचि येती ॥ ग्रंथ वदविता श्रीरुक्मिणीपती ॥ निश्चय चित्तीं असों द्या ॥८॥
सूत्रदोरी तुटलियावरी ॥ बाहुलें नाचेल कैशापरी ॥ वारा निवांत राहिला जरी ॥ तरी वृक्ष सर्वथा डोलेना ॥९॥
गताध्यायीं निरूपण काय ॥ नामदेवें उठविली गाय ॥ राजा येऊनि वंदिले पाय ॥ आनंद जाहला सर्वांसी ॥१०॥
चमत्कार दाखवून वेगेंसीं ॥ निघाले पुसोनि सर्वांसी ॥ मार्गीं चालतां दिवानिशीं ॥ स्मरण मानसीं हरीचें ॥११॥
ज्या ज्या देशीं जाती तीर्था ॥ तेथें तैसीच करिती कविता ॥ भाषापरत्वें अमोलिकता ॥ गुण वर्णिती हरीचे ॥१२॥
नानादेशींची तीर्थें बहुत ॥ विस्तारें सांगतां वाढेल ग्रंथ ॥ नामदेवें विलोकून त्वरित ॥ आनंदवनासी पैं आले ॥१३॥
करूनि भागीरथीचें स्नान ॥ घेतलें विश्वेश्वराचें दर्शन ॥ इतुकेन कृतार्थ होऊन ॥ परम उल्हास मानसीं ॥१४॥
चातुर्मास राहिले तेथ ॥ तों नवल वर्तलें अति अद्भुत ॥ कबीराचें घरीं अकस्मात ॥ साधु संत पातले ॥१५॥
रात्र जाहली दोन प्रहर ॥ निद्रित जाहले नारीनर ॥ तो अकस्मात वैष्णववीर ॥ निजदृष्टीं देखिले ॥१६॥
कबीर कांता दोघें जण ॥ उठोनि केलें साष्टांग नमन ॥ घर मोडकें अति जीर्ण ॥ कूड मोडोनी गेला असे ॥१७॥
घरीं नाहीं तिळभर अन्न ॥ उपवासीं मुलें निजलीं जाण ॥ तयांखालील बोर्या काढून ॥ संतां बैसणें घातलें ॥१८॥
कबीर म्हणे निजकांतेसी ॥ कांहीं नैवेद्य करावा यांसी ॥ अवश्य म्हणे भ्रतारासी ॥ परी चिंता मानसीं उद्भवली ॥१९॥
म्हणे धान्य तों नाहीं निजमंदिरीं ॥ उसणें कोणीच न देती नगरीं ॥ मग धैर्य धरूनि निजअंतरीं ॥ चालिली बाजारीं एकटीं ॥२०॥
मार्गीं चालतां अति त्वरेनें ॥ मुखें करीत श्रीरामभजन ॥ म्हणे अन्न मिळे जरी करितां प्रयत्न ॥ तरी सत्वा हानि होईल ॥२१॥
वाणियाचे ओळीस येऊन त्वरित ॥ सभोंवतें जंव विलोकित ॥ तंव एक्या दुकानांत अकस्मात ॥ वाणी जागृत देखिला ॥२२॥
सन्निध जाऊनि ते अवसरीं ॥ तयासी बोले मधुरोत्तरीं । पाहुणे संत आमुचें घरीं । तीर्थें करीत पातले ॥२३॥
शिधासाहित्य पाहिजे त्यांसी ॥ उशीर न करावा द्यावयासी ॥ द्रव्य सांगाल तें तुम्हांपासीं ॥ आणोनियां देईन ॥२४॥
वाणी म्हणे तिजकारण ॥ तूं कोणाची आहेस कवण ॥ येरी बोले प्रतिवचन ॥ मधुरोत्तरें तयासी ॥२५॥
अविंधवंशीं वैष्णव वीर ॥ तो कबीर माझा निजभ्रतार ॥ ऊठ सामग्री दे सत्वर ॥ साधुसंत भुकेले ॥२६॥
ऐसें बोलतांचि सुंदर ॥ वाणी जाहला कामातुर ॥ जेवीं अहल्या देखोनि शचीवर ॥ करी अविचार मानसीं ॥२७॥
कीं पार्वती देखोनि सुंदर ॥ कामें व्यापिला भस्मासुर ॥ कीं विश्वजननीसी दशकंधर ॥ पापदृष्टीं जेवीं पाहे ॥२८॥
नातरी पांडवजाया द्रौपदी सती ॥ तिसीं दुर्योधन धरी कुमती ॥ तैसा वाणी पापमती ॥ कबीरकांतेसी बोलत ॥२९॥
म्हणे माझे मनोरथ करिसी पूर्ण ॥ तरी सामग्री देईन तुजकारण ॥ द्रव्य आणि वस्त्रें भूषण ॥ मागशील तें देईन मी ॥३०॥
कांहीं संकोच धरिसी मनीं ॥ तरी मागुती जाईं परतोनी ॥ ऐकूनि दुर्जनाची वाणी ॥ विचार मनीं करीतसे ॥३१॥
म्हणे नाहीं म्हणतां याजकारण ॥ तरी आणिक कोठें न मिळेचि अन्न ॥ संतांसी पडतां उपोषण ॥ सत्त्वासी हानि होईल ॥३२॥
समय पडेल तैसें वर्तणें ॥ प्रसंगाऐसें उत्तर देणें ॥ सभा पाहूनि कीर्तन करणें ॥ बीज पेरणें भूमीऐसें ॥३३॥
हरिश्चंद्र राजा सत्त्वगुणी ॥ डोंबाघरीं वाहे पाणी ॥ तारामती तयाची राणी ॥ क्लेश भोगूनि राहिली ॥३४॥
वार्याऐसें उपणावें भूस ॥ बुडतां धरावी अंत्यजकांस ॥ दुष्काळीं अन्न कृपाणास ॥ मागणें लागे याचकां ॥३५॥
साधावया संसारकाज ॥ अविंधसेवा करित द्विज ॥ प्रसंगीं उदेला कलिराज ॥ तो वर्तवी सहज अघटित ।३६॥
स्वधर्म आणि अधर्म जाण ॥ शास्त्रीं बोलिले मनुष्याकारण ॥ जेणें जोडती श्रीहरीचे चरण ॥ तरी अधर्म अवश्य करावा ॥३७॥
माता पिता तीर्थ जाण ॥ ज्येष्ठबंधु त्याचि समान ॥ कुळगुरु आणि अभ्यागत जाण ॥ आज्ञा प्रमाण तयांची ॥३८॥
जरी ऐकता भरत मातृवचन ॥ तरी कैसे जोडते श्रीरामचरण ॥ प्रल्हादें पित्यासी अव्हेरून ॥ नरहरि प्रसन्न केला कीं ॥३९॥
बळीनें नायकोनि शुक्रवचन ॥ वामनासी अर्पिलें त्रिपाददान ॥ कीं गौळणी भ्रतारांसी टाकून ॥ जाहल्या तल्लीन कृष्णरूपीं ॥४०॥
मोडूनि प्राणनाथांचें वचन ॥ ऋषिपत्यांनीं नेलें अन्न ॥ जरी धरिलें असतें शास्त्रवचन ॥ तरी श्रीहरिचरण अंतरते ॥४१॥
तेवीं शास्त्र विचारितां मानसीं ॥ संत साधु राहतील उपवासी ॥ तरी वचन देऊनि वाणियासी ॥४२॥
मग अयोध्यावासी जानकीजीवन ॥ तो अंतरसाक्ष चैतन्यघन ॥ त्याचें करितां नामस्मरण ॥ अरिष्ट निरसेल सर्वही ॥४३॥
मग कबीरपत्नी धैर्य धरून ॥ वाणियासी बोले प्रतिवचन ॥ आधीं सामग्री दे मजकारण ॥ मग मी येईन निश्चयेंसीं ॥४४॥
रात्र बहुत लोटलिया जाण ॥ धरीं उपवासी साधुजन ॥ उशीर लागतां मजकारण ॥ निद्रित होतील वैष्णव ॥४५॥
ऐसें ऐकतां वाणियास ॥ चित्तीं न वाटेचि विश्वास ॥ जेवीं दुर्योधनाचे दृष्टीस ॥ सात्त्विक कोणी दिसेना ॥४६॥
आंधळ्यांसी आंधळें दिसे जाण ॥ तस्करांसी चंद्रमा भासे मलिन ॥ रोगी म्हणे हें मिष्टान्न ॥ कडवट कासया रांधिलें ॥४७॥
कृपणासी नाहीं भूतदया ॥ मांसभक्षकासी कैंची माया ॥ क्षयरोगियासी दिव्यकाया ॥ स्वप्नींही दृष्टीं नये कीं ॥४८॥
खळासी कैंचा प्रेमरस ॥ साधु न भेटें निंदकास ॥ ब्राह्मणआचार अंत्यजास ॥ सत्य न भासे सर्वथा ॥४९॥
तेवीं कबीरकांतेच्या वचनासी ॥ प्रमाण न मानी निश्चयेंसी ॥ म्हणे भाक देसील जरी मजसी ॥ सत्य मानसीं तैं वाटे ॥५०॥
ऐकूनि दुर्बुद्धीचें वचन ॥ धैर्यबळें आंवरिलें मन ॥ म्हणे यासी न देतां वचन ॥ सामग्री पदरीं नये कीं ॥५१॥
मग भाक देऊनि ते अवसरीं ॥ सर्व साहित्य घेतलें पदरीं ॥ सत्वर जाऊनि निजमंदिरीं ॥ साहित्य करी निजप्रेमें ॥५२॥
मग कबीरकांतेसी संत बोलती ॥ आम्हीं स्वहस्तें पाक करूं निश्चितीं ॥ मग पाकपात्रें घेऊनि प्रीतीं ॥ स्वयंपाक करिती वैष्णव ॥५३॥
नानापरींचीं पक्वान्नें ॥ सप्रेमभरीं रांधिलीं जाण ॥ मग नवरस पात्रीं वाढून ॥ पूजाविधान आरंभिलें ॥५४॥
गंधाक्षता सुमनहार ॥ परिमळद्रव्यें उपचार ॥ धूप दीप दाखवूनि सत्वर ॥ भावें नमस्कार घातले ॥५५॥
सप्रेमभावें यथारुचित ॥ साधुसंत जाहले तृप्त ॥ मग कबीरपत्नीनें निजकांत ॥ एकांतमंदिरीं बोलाविला ॥५६॥
कांता म्हणे कबीरासी ॥ तुम्हीं असावें संतांपासीं ॥ म्यां भाक देऊन वाणियासी ॥ सामग्री वेगेंसीं आणिली ॥५७॥
त्याचे मनोरथ करावया पूर्ण ॥ आज्ञा द्यावी मजकारण ॥ उशीर होतां उगवेल दिन ॥ मग सत्वासी हानि होईल ॥५८॥
ऐकूनि म्हणे कबीरभक्त ॥ मीही येतों तुजसांगात ॥ त्या वाणियाचा उपकार बहुत ॥ आम्हांवरी जाहला असे ॥५९॥
आजि संतांसी मिळालें अन्न ॥ हें तंव त्याचेंच होय पुण्य़ ॥ त्याच्या उपकारा उत्तीर्ण ॥ नव्हे आमुचेच सर्वथा ॥६०॥
तुजही उपाय बरा सुचला ॥ संतकारणीं देह लाविला ॥ आता स्कंधीं घेऊन तुजला ॥ नेऊनि घालितों ते ठायीं ॥६१॥
महापर्जन्य पडतां मेदिनीं ॥ तमें दाटली घोर रजनी ॥ एकलें जातां तुजलागुनी ॥ भय निजमनीं वाटेल ॥६२॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ कांतेसी बैसविली स्कंधावरी ॥ कबीर जावया बाजारीं ॥ चाले झडकरीं लगबगें ॥६३॥
मार्गीं चालतां दोघें जण ॥ सप्रेम करिती श्रीरामभजन ॥ म्हणती धन्य आजिचा सुदिन ॥ वैष्णव घरासी पातले ॥६४॥
ऐसें बोलतां एकमेकांसी ॥ सत्वर आली दुकानापासीं ॥ कबीर म्हणे निजकांतेसी ॥ जातों घरासी मी आतां ॥६५॥
घरीं असती साधुसंत ॥ उठोनि जातील अकस्मात ॥ मी त्यांजपासीं जातों त्वरित ॥ चरणसेवा करावया ॥६६॥
तुवां संकोच न धरावा किंचित ॥ पुरवीं वाणियाचे मनोरथ ॥ ऐसें म्हणोनि कबीरभक्त ॥ गेला त्वरित घरासी ॥६७॥
तंव वाणी कामातुर होऊन ॥ वाट पाहत बैसला जाण ॥ म्हणे रात्रीं एकटी येऊन ॥ गेली ठकवून मजलागीं ॥६८॥
ऐसें दुराचारी बोलतां ॥ तों पुढें देखिली कबीरकांता ॥ हर्ष वाटला तयाचें चित्ता ॥ सत्य वचनार्था केलें वो ॥६९॥
स्वस्थानीं बैसतीं जाण ॥ वाणी बोलिला तिजकारण ॥ कर्दमें भरले नाहींत चरण ॥ वर्षतां घन अपार ॥७०॥
हे आशंका माझिये चित्तीं ॥ तरी सत्यचि सांगावें गुणवती ॥ वचन ऐकोनि ते सती ॥ वाणियाप्रती काय बोले ॥७१॥
ऐक गा शेटिया गुणवंता ॥ यथार्थ सांगतें मी आतां ॥ तुजसी देऊनि वचनार्था ॥ साधुसंतां तोषविलें ॥७२॥
वैष्णव पावले समाधान ॥ हें तंव तुझेंचि जाहलें पुण्य ॥ तुझा उपकार आम्हांवरी पूर्ण ॥ न फिटेचि सर्वथा ॥७३॥
मी पतिव्रता म्हणवितें जाण ॥ भ्रतारआज्ञा मज प्रमाण ॥ तुजला दिधलें भाकदान ॥ संकट जाणोनि ते वेळीं ॥७४॥
कबीर माझा प्राणनाथ ॥ तयासी सांगितला वृत्तांत ॥ तेणें स्कंधीं वाहूनि मातें ॥ आणिलें सत्वर तुजपासीं ॥७५॥
आपण परत गेला मागुती ॥ आतां तुवां सोडूनि आपुली भ्रांती ॥ काय कामना असेल चित्तीं ॥ पुरवीं त्वरित ये समयीं ॥७६॥
ऐसें बोलतां सत्त्वराशी ॥ अनुताप जाहला वाणियासी ॥ म्हणे म्यां येऊनियां नरदेहासी ॥ सार्थक कांहींच न केलें ॥७७॥
चौर्यायसीं लक्ष हिंडोनि पाहीं ॥ अवचित आलों मनुष्यदेहीं ॥ येथेंही विचार न करूनि कांहीं ॥ विषयावरी लंपट जाहलों कीं ॥७८॥
कबीर विरक्त उदार जाण ॥ त्याचे कांतेचें केलें छळण ॥ जेवीं लोहशस्त्र हातीं घेऊन ॥ तुळसीवनचि कापिलें ॥७९॥
कीं हातीं घेऊनि कुदळी ॥ यज्ञशाळा बळेंचि पाडिली ॥ कीं शिवपूजा लोटोनि दिधली ॥ लत्ताप्रहारेंकरूनियां ॥८०॥
कीं अमृतकुंभ उलंडिला ॥ की शालिग्राम फोडोनि टाकिला ॥ कीं वट पिंपळ देखोनि तोडिला ॥ कुठारशस्त्रेंकरूनियां ॥८१॥
गंगा उतरूनि गेलों अस्नात ॥ कीं वाचें निंदिलें श्रीभागवत ॥ तैसेचि दोषे घडले मातें ॥ कबीरभक्त छळितांचि ॥८२॥
कांतेसी देईल भोगदानीं ॥ ऐसा भ्रतार न दिसे कोणी ॥ धन्य हे माता सद्गुणखाणी ॥ आदिजननी जगदंबा ॥८३॥
ऐसा अनुताप धरूनि मनीं ॥ नमस्कार केला तिजलागुनी ॥ म्हणे मी बाळक तूं जननी ॥ अपराध न गणीं सर्वथा ॥८४॥
अज्ञानपणें मीं नेणतां ॥ छळणा केली तुझी तत्त्वतां ॥ सर्व क्षमा करूनियां आतां ॥ अभयदान मज देईं ॥८५॥
मज बाळकासी धरोनि करीं ॥ घालीं कबीराचे पायांवरी ॥ म्हणूनि मस्तक चरणांवरी ॥ पुनः मागुती ठेविला ॥८६॥
ऐसें ऐकूनि करुणावचन ॥ म्हणे धन्य वाणिया तुझें मन ॥ नवनीताऐसें मृदु जाण ॥ मजकारण भासत ॥८७॥
उदंड केल्या दुष्कर्मराहाटी ॥ शेवटीं अनुताप उपजला पोटीं ॥ तरी दुरितें गेलीं उठाउठी ॥ बोलिलें श्रेष्ठीं शास्त्रमत ॥८८॥
आधीं केलें विषभक्षण ॥ त्यावरी लाधलें अमृतपान ॥ तरी अपाय निश्चित चुकला जाण ॥ ऐसें सर्वज्ञ बोलती ॥८९॥
म्हणूनि ऐक गा धैर्यवंता ॥ अनुताप जाहला तुझिया चित्ता ॥ तेव्हांचि भवरोग तत्वता ॥ गेला परता पळोनी ॥९०॥
आतां तुज आणि कबीरासी ॥ भेटी करीन मी वेगेंसीं ॥ ऐसें ऐकूनि वाणियासी ॥ परम आल्हाद वाटला ॥९१॥
सांडोनि दांभिक अभिमान ॥ टाकूनि रजतमोगुण ॥ टाकोनियां मोहभ्रम ॥ सात्विक लक्षण दृढ धरिलें ॥९२॥
यापरी होऊनि शुद्ध सोज्ज्वळ ॥ दुकान टाकिलें तत्काळ ॥ निघे तिथोनि उतावेळ ॥ मायाजाळ तोडूनी ॥९३॥
कबीरकांतेच्या समागमें जाण ॥ सत्वर आला नलगतां क्षण ॥ मग अनन्यभावें साष्टांग नमन ॥ प्रेमेंकरून घातलें ॥९४॥
म्हणे मी अज्ञान बालक नेणत ॥ अनंत अपराध केले सत्य ॥ ते क्षमा करूनि अभयहस्त ॥ दिधला पाहिजे निजदासा ॥९५॥
अंतरसाक्ष कबीरें पूर्ण ॥ अनुतापयुक्त ॥ ओळखिलें चिन्ह ॥ मग वाणीयासी आलिंगन देऊन ॥ अभय वरदान दिधलें ॥९६॥
भाव विश्वास ज्ञानशीळ ॥ उदास विरक्त सर्वकाळ ॥ ऐसा कबीरभक्त प्रेमळ ॥ दीनदयाळ सर्वांसी ॥९७॥
वाणियासी अनुताप होऊन ॥ करिता जाहला श्रीरामभजन ॥ संतसंगाचें महिमान ॥ न कळे जाण श्रुतिशास्त्रां ॥९८॥
कबीराची कीर्ति अति अद्भुत ॥ नामदेवासी जाहली श्रुत ॥ मग ज्ञानदेवासी सांगोनि मात ॥ आले भेटीस कबीराच्या ॥९९॥
नामा ज्ञानदेव देखोनि नयनीं ॥ नमस्कार घातलास साष्टांग चरणीं ॥ कबीरासी आनंद वाटला मनीं ॥ प्रेमेंकरूनी भेटले ॥१००॥
मग बैसावयाकारण ॥ भूमीवरी घातलें तृणासन ॥ प्रेमामृतें सजलनयन ॥ झाले असती दोघांचे ॥१॥
ज्ञानदेव म्हणे नामयासी ॥ मागील आठव धरीं मानसीं ॥ क्षीरसागरीं आज्ञा कैसी ॥ दिधली तुम्हांसी नारायणें ॥२॥
तूं तरी उद्धव साक्षात ॥ शुकअवतार कबीरभक्त ॥ शुक्तिकेपोटीं अवतार सत्य ॥ तुम्ही घेतला मृत्युलोकीं ॥३॥
भक्तिमार्ग जाहला मलिन ॥ प्रपंचीं बुडाले अवघे जन ॥ त्यांचें करावया उद्धरण ॥ कर्मभूमीसी आलेती ॥४॥
ऐसें बोलतां ज्ञानेश्वर ॥ उभयतां करिती नमस्कार ॥ अंतरींची खूण परस्पर ॥ कळों आली तयासी ॥५॥
ज्ञानदेव म्हणे कबीरासी ॥ पंढरीक्षेत्र दक्षिणदेशीं ॥ तेथें पुंडलीकाचे भेटीसी ॥ वैकुंठवासी पातले ॥६॥
साक्षात् परब्रह्मरूप सगुण ॥ लीलानाटकी जगज्जीवन ॥ जो नामयाचें प्रेमजीवन ॥ उभा ठाकला विटेवरी ॥७॥
तुम्ही येऊनि एके दिनीं ॥ तें आदिक्षेत्र पाहावें नयनीं ॥ ऐकोनि ज्ञानदेवाची वाणी ॥ कबीर चरणीं लागला ॥८॥
कबीर म्हणे ज्ञानदेवासी ॥ एकादशीस कार्तिकमासीं ॥ अगत्य येऊं दर्शनासी ॥ वचन तयासी दिधलें ॥९॥
कबीरासी पुसोनि तयें क्षणीं ॥ सत्वर निघाले तेथूनी ॥ पुढें सुरस कथा सज्जनीं ॥ सादर कर्णीं ऐकावी ॥११०॥
जैअसा तृषाक्रांत सेवी जीवन ॥ कीं भुकेला जेवी मिष्टान्न ॥ तेवीं भक्तकथेसी लावूनि मन ॥ सादर ऐका भाविक हो ॥११॥
एक प्रेमभाव धरिला चित्तीं ॥ तर अनंत लाभ होतां येती ॥ श्रोतयांसी विनवी महीपती ॥ होय सुखप्राप्ति स्वानंदें ॥१२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकता तुटेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकादशाध्याय रसाळ हा ॥११३॥
॥ अध्याय ॥११॥ ॥ ओंव्या ॥११३॥ ॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री भक्तविजय अध्याय १०
श्री भक्तविजय अध्याय ९
श्री भक्तविजय अध्याय ८
श्री भक्तविजय अध्याय ७
श्री भक्तविजय अध्याय ६
सर्व पहा
नवीन
नृसिंहस्तोत्रम्
आरती गुरुवारची
दशावतारस्तोत्रम्
गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील
Saubhagya Panchami 2024 : आज मनापासून शिव - शंभूची पूजा करा, सर्व इच्छा पूर्ण होतील.
सर्व पहा
नक्की वाचा
Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत
तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?
हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात
हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा
ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा
पुढील लेख
श्री भक्तविजय अध्याय १०
Show comments