वसंत पंचमी सरस्वती देवीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. वीणावादिनी मां शारदाचे स्वरूप सौम्य आहे आणि त्यांच्यासाठी जपण्यात येणारे मंत्र दिव्य. या मंत्रांचा जप करुन बल, विद्या, बुद्धी, तेज आणि ज्ञानाची प्राप्ती होते.
* 'ऎं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायां। सर्व विद्यां देही दापय-दापय स्वाहा।'
* 'वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि। मंगलानां च कर्त्तारौ वन्दे वाणी विनायकौ॥'
अर्थातः अक्षर, शब्द, अर्थ आणि छंदाचे ज्ञान देणार्या भगवती सरस्वती आणि मंगलकर्ता विनायकाची वंदना असो - श्रीरामचरितमानस
वसंत पंचमीला शिव पूजनाचे देखील विशेष महत्व आहे. या दिवशी शिवाची पार्थिव प्रतिमा स्थापित करुन विधीपूर्वक पूजा-अर्चना करुन दूध, दही, तूप, साखर, मध, पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करावे.