Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील सर्वात लठ्ठ महिलेचा मृत्यू

iman ahmad
Webdunia
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017 (09:22 IST)

जगातील सर्वात लठ्ठ असलेल्या इमान अहमद (36) या महिलेचा मृत्यू झाला आहे. अबुधाबीतील बु्र्जिल रुग्णालयात वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान तिचं निधन झालं.

काही महिन्यांपूर्वी वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर सैफी रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन 500 किलोंवरुन 238 किलोंपर्यंत कमी झाल्याची माहिती होती. वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती. वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान किडनी फेल आणि आतड्याला सूज आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आलं. 

सैफी रुग्णालयात प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला इमानवर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करत होते. शस्त्रक्रियेसाठी वन बेड हॉस्पिटल ही संकल्पना वापरण्यात आली होती. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी 3 हजार स्क्वेअर फुटांची विशेष खोली बनवण्यात आली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा कोणी निर्माण केला?नितेश राणेंच्या वक्तव्याने गोंधळ

LIVE: शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या

छत्रपती संभाजीनगर येथील एका बँकेच्या शाखेत चोरीदरम्यान सिलिंडरचा स्फोट,बँक जळून खाक

मुंबईत जैन मंदिर पाडल्यावरून गदारोळ,अबू आझमींनी दिली प्रतिक्रिया

नागपुरात पूर्व वैमनस्यातून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या, आरोपी फरार

पुढील लेख
Show comments