Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'द मॅन विथ 1000 किड्स' मधल्या परदेशी 'विकी डोनर'ची गोष्ट

Webdunia
शुक्रवार, 12 जुलै 2024 (16:26 IST)
'काही कुटुंबांचं असं म्हणणं आहे की, त्यांची फसवणूक झाली आहे. पण समोरच्या व्यक्तीने काहीही चुकीचं केलं नसल्याचं ते सांगत आहेत.'
 
आम्ही बोलत आहोत जोनाथन जेकब मेजरबद्दल.
 
नेदरलँडमधील एका न्यायालयाने या व्यक्तीच्या शुक्राणू दान करण्यावर बंदी घातल्यानंतर, 2017 साली हा 43 वर्षीय माणूस अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
 
नेदरलँडमधील कुठच्याही फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जाऊन, शुक्राणू दान करण्यास त्याच्यावर बंदी घातली गेली होती.
 
जोनाथनवर 'आरोप' असा होता की, त्याने फक्त नेदरलँड्समध्ये 100 मुलांच्या जन्मासाठी 'योगदान' दिलं होतं. त्या देशात 25 वेळाच शुक्राणू दान करण्याची कायदेशीर परवानगी असताना जोनाथन यांनी तब्बल शंभर मुलांच्या जन्मासाठी असा 'हातभार' लावल्याचं उघड झालं होतं.
 
दुसरीकडे जोनाथन यांचं असं म्हणणं आहे की असं करुन त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, त्यांनी शुक्राणू दान केल्यामुळे शेकडो लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला आहे.
 
2023 मध्ये, जोनाथन यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली.
 
जोनाथन यांनी शुक्राणूंची विक्री सुरू ठेवली आणि डच अधिकाऱ्यांचा अंदाज आहे, की त्या वर्षी जगभरातील अंदाजे 1,000 बाळांच्या जन्मात त्यांनी त्यांचं 'योगदान' दिलं असावं.
 
जोनाथन यांच्यावरच्या आरोपांमधून असं दिसून आलं की त्यांनी शेकडो कुटुंबांपासून त्यांनी यापूर्वी केलेल्या शुक्राणू दानाचा आकडा लपवून या कुटुंबांची फसवणूक केली.
 
काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या एका माहितीपटाच्या मालिकेत जोनाथनच्या शुक्राणूंचा वापर करणाऱ्या अनेक महिलांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे.
 
या माहितीपटामध्ये या महिलांनी जोनाथनचा धूर्तपणा कसा पकडला गेला हे सांगितलं आहे.
 
यापैकी एका महिलेने तिला आलेला अनुभव सांगताना म्हटलं की, जोनाथनच्या यापूर्वीच्या मुलांची संख्या कळल्यावर तिला तिची फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे आणि सध्या ती दुःखी आणि उदास आहे.
 
जोनाथन यांनी नेटफ्लिक्सच्या या मालिकेत भाग घेण्यास नकार दिला असला, तरी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. स्वतःच्या वर्तनाचा बचाव करताना ते म्हणाले की, 'त्यांचे शुक्राणू मिळालेले अनेक लोक आनंदी आहेत.'
 
जोनाथन यांचं स्पर्म डोनेशन
जोनाथन यांनी जवळपास 17 वर्षे स्पर्म डोनेशन केलं. अनेकवेळा गोपनीयता बाळगत त्यांनी हे दान केलं. शुक्राणू देण्यासाठी फर्टिलिटी क्लिनिकमध्ये न जात थेट शुक्राणू शोधत असलेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांनी त्यांच्याशीच सौदा केला.
 
नेदरलँडमध्ये त्यांनी 102 बाळांच्या जन्मात मदत केली. या कामासाठी त्यांच्याकडून 11 फर्टिलिटी क्लिनिक्सकडून शुक्राणू घेण्यात आले होते.
 
नेदरलँड्समध्ये 2017 पासून त्यांच्यावर शुक्राणू दान करण्यास बंदी असल्याने त्यांनी 2023 पर्यंत आपले शुक्राणू देशाबाहेर पाठवणे सुरू ठेवले.
 
त्याच वर्षी एका महिलेने आणि एका संस्थेने त्यांच्याविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला.
 
याचिकाकर्त्यांनी दावा केला की जोनाथनच्या या कृतीमुळे त्यांच्या मुलांसाठी अनाचार (नातेवाईकांमधील लैंगिक संबंध) होण्याचा धोका वाढला आहे.
 
जोनाथनने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 550 ते 600 मुलांच्या जन्माला तो जबाबदार असल्याची कबुली दिली आहे.
 
तथापि, न्यायालयाचे म्हणणे आहे की वेगवेगळ्या उपखंडात जोनाथन यांची सुमारे एक हजार मुले आहेत.
 
शेवटी, जोनाथनच्या केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकांवर शुक्राणू दान करण्यास बंदी घातली. जर तरीही त्यांनी स्पर्म डोनेशन सुरूच ठेवले तर प्रत्येक स्पर्म डोनेशनसाठी एक लाख डॉलर्सचा दंड ठोठावला जाईल, असंही कोर्टाने बजावलं आहे.
 
'द मॅन विथ 1000 किड्स'
नेटफ्लिक्सवरच्या या मालिकेचं नाव आहे 'द मॅन विथ 1000 किड्स'.
 
या माहितीपटात अशा अनेक कुटुंबांच्या आणि स्त्रियांच्या मुलाखतींचा समावेश आहे ज्यांनी शोधून काढले की त्यांना ज्या जोनाथन जेकब यांनी शुक्राणू दान केले त्यांना आधीच शेकडो मुले आहेत.
 
शुक्राणू दान करताना जोनाथनने ही माहिती आपल्यापासून लपवून ठेवल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
यातील एका मातेने सांगितलं की, "मी खूप निराश आहे कारण शुक्राणू दान करताना त्याने सांगितलं होतं की तो केवळ पाचच कुटुंबांना त्याचे शुक्राणू देणार आहे."
 
नताली नावाच्या या महिलेने बीबीसीशीही संवाद साधला.
 
नताली यांनी सांगितलं की त्यांना जोनाथनच्या कारनाम्यांची माहिती माध्यमांकडून मिळाली.
 
नताली म्हणतात की, "सर्वात मोठी चिंता ही आहे की ही मुले एक दिवस भेटतील आणि एकमेकांच्या प्रेमात पडतील कारण त्यांना काहीतरी साम्य सापडेल आणि त्यांना हे कळणार नाही की त्यांचा जन्म एकाच पालकाने दान केलेल्या शुक्राणूंमधून झाला आहे."
 
जोनाथन म्हणतात की, नेटफ्लिक्सने बनवलेली ही मालिका फक्त 'नाखूष' असणाऱ्या लोकांच्या गोष्टींवर केंद्रित आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञ असणाऱ्या अनेक कुटुंबांकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे.
 
जोनाथन यांनी बीबीसीला सांगितलं की, "नेटफ्लिक्सने जाणूनबुजून या माहितीपटाचं शीर्षक 'द मॅन विथ 1000 किड्स' असं दिलं आहे. खरंतर या मालिकेचं नाव 'द स्पर्म डोनर हू हेल्प्ड फॅमिलीज कन्सिव्ह 550 चिल्ड्रन' (550 बाळांच्या जन्मासाठी अनेक कुटुंबांना गर्भधारणेमध्ये मदत करणारा स्पर्म डोनर)असं असायला हवं. म्हणूनच ते सुरुवातीपासून खोटे बोलत आहेत आणि जाणूनबुजून खोटे बोलत आहेत."
 
जोनाथन यांनी बीबीसीला हेही सांगितलं की शेकडो मुलांच्या जन्मासाठी त्यांच्या पालकांना वीर्यदान करण्यात त्यांना काहीही चुकीचं वाटत नाही.
 
त्यांनी हे करत असताना त्यांची ओळख लपवलेली नसल्यामुळे त्यांना असं वाटत नाही की त्यांच्या शुक्राणूंचा वापर करून जन्माला आलेल्या मुलांमध्ये लैंगिक संबंध निर्माण होऊ शकतात.
 
याबाबत बोलताना जोनाथन म्हणतात की, "मी तुम्हाला खात्री देतो की आताच्या काळात अत्यंत स्वस्त दरात डीएनए चाचणी किट उपलब्ध आहेत आणि माझे रेकॉर्ड डीएनए डेटाबेसमध्ये आहे जेणेकरून कोणीही माझा शोध घेऊ शकेल."
 
नेटफ्लिक्सविरुद्ध खटला दाखल करणार असल्याचं जोनाथन यांनी सांगितलं आहे. नेटफ्लिक्सने जोनाथनच्या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
 
या मालिकेच्या कार्यकारी निर्मात्या नताली हिल यांनी सांगितलं की, त्यांनी या माहितीपटासाठी चार वर्षे संशोधन केलं आणि सुमारे 50 पीडित कुटुंबांशी त्यांचं बोलणं झालं आहे.
 
त्या म्हणाल्या की, "त्याच्या खोटेपणाबद्दल पन्नास कुटुंबांनी कोर्टात धक्कादायक विधाने केली आहेत. त्यांनी जोनाथनला शुक्राणू दान करण्यापासून रोखण्यासाठी न्यायाधीशांकडे प्रार्थना केली आहे. आम्ही या प्रकरणावर जोनाथनची बाजू माहितीपटामध्ये समाविष्ट करण्यास तयार आहोत."
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुढील लेख