Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Google Maps चे हे 5 शानदार फीचर्स, माहित नसतील तर जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (17:02 IST)
Google Maps आता तो काळ गेला जेव्हा ऐखाद्या नवीन किंवा अनोळखी ठिकाणी पोहचण्यासाठी लोकांची विचारपूस करावी लागायची. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि प्रत्येक स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप असल्याने कुठे ही पोहचणे सोपे झाले आहे. तुम्हाला कुठेही जायचे असल्यास गुगल मॅप्स तुम्हाला लगेच मार्ग आणि वेळ दर्शवतो. एवढेच नाही तर या ॲपवर तुम्हाला किती ट्रॅफिक आहे, पेट्रोल पंप आणि रेस्त्रां कुठे आहे इतर माहितीही मिळत असते. अशात आज आम्ही तुम्हाला गुगल मॅपच्या काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे लोक सहसा वापरत नाही पण हे फीचर्स तुमचे दैनंदिन जीवन खूप सोपे बनवू शकतात.
 
1. ऑफलाइन मॅप
मॅप वापरत असताना कधी इंटरनेट नसल्यास किंवा नेटवर्क उपलब्ध नसल्याची परिस्थिती उद्भवते. अशात मॅप कसे वापरावे अशा प्रश्न असेल तर या ॲपमध्ये तुम्हाला ऑफलाइन मॅपची सुविधाही मिळते. या फीचरमुळे तुम्ही इंटरनेटशिवाय मॅप वापरू शकाल. यासाठी तुम्ही जिथे जात आहात त्या ठिकाणाचा मॅप अगोदर डाउनलोड करावा लागेल. यासाठी तुम्हाला ऑफलाइन मॅप पाहिजे असलेले ठिकाण शोधावे लागेल. वरच्या उजव्या कॉर्नरवर असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करुन तुम्हाला ऑफलाइन मॅप डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. जर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी जात असाल जिथे नेटवर्कचा इशू असेल तर हे वैशिष्ट्य तिथे खूप उपयुक्त ठरू शकते.
 
2. सेव्ह पार्किंग फीचर
जर आपल्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आपले वाहन शोधण्यात समस्या येत असेल तर गूगल मॅप्सचा हा फीचर आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. गूगल मॅप्सचा सेव्ह पार्किंग फीचर आपले काम सोपे करेल. आपली गाडी पार्क केल्यानंतर गूगल मोप्स अॅप उघडायचे आहे आणि आपली लोकेशन दाखवत असलेल्या ब्लू डॉट ला टच करायचे आहे. याने आपल्या सेव्ह पार्किंग ऑप्शन दिसेल. एंड्रॉयड फोन असल्यास लोकेशनसह फोटो आणि नोट्स देखील जोडता येऊ शकतात. या व्यतिरिक्त गाडीची लोकेशन आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सामील एखाद्या व्यक्तीला शेअर देखील करु शकतात. जर कुठे गाडी सोडायची असेल तर हे फीचर ख़प कामास येते.
 
3. स्टिकी नोट
गूगल मॅप्समध्ये लेबल जोडण्याचे वैशिष्ट्य देखील गोष्टी खूप सोपे करते. हे तुमच्या आवडत्या ठिकाणी एक स्टिकी नोट जोडण्यासारखे आहे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल जे तुम्हाला खूप आवडत असेल तर हे फीचर तुम्हाला ते ठिकाण तुम्हाला हवं तसं दाखवेल. यासाठी तुम्हाला ॲपवर एक स्थान निवडावे लागेल आणि त्याच्या नावावर टॅप करावे लागेल, जे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती उघड करेल. यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कॉर्नरला असलेल्या डॉट्सवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला एड ​​लेबलचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ठिकाणाचे नाव देऊ शकता. आता तुम्ही जेव्हा जेव्हा गुगल मॅप उघडता तेव्हा तुम्हाला ते ठिकाण लगेच ओळखता येईल. यामुळे तुमच्या आवडत्या ठिकाणांचा मागोवा घेणे खूप सोपे होते.
 
4. मल्टीपल लोकेशंस
आपल्या एकापेक्षा अधिक ठिकाणी जायचे असल्यास काळजी करण्याची गरज नाही. आपल्या या समस्येचे निराकरण गुगल मॅपवरही उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मार्गातील लोकेशन्स पिन देखील करू शकता. यानंतर मॅप तुम्हाला तोच मार्ग दाखवेल जो त्या पिन लोकेशनमधून जाईल. यासाठी फायनल लोकेशन टाकल्यानंतर ॲड स्टॉपचा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी थांबायचे आहे ते स्थान टाकावे लागेल. यानंतर मॅप आपोआप तुम्हाला मार्ग सांगेल जो मध्यभागी न थांबता अंतिम गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम मार्ग असेल.
 
5. रियल टाइम लोकेशन शेयरिंग
जर तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना फोन न करता तुम्ही कुठे आहात हे सांगायचे असेल किंवा तुम्हाला कोणालातरी भेटायचे असेल आणि त्यांना ते सापडत नसेल तर अशा परिस्थितीत हे फीचर खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही तुमच्या संपर्क यादीतील कोणाशीही तुमचे रिअल-टाइम स्थान शेअर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर लोकेशन शेअरिंग पर्याय निवडा आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचे लोकेशन शेअर करायचे आहे ती निवडा. तुमचे स्थान कोणाशी तरी किती काळ शेअर करायचे हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही त्याचा कालावधी 15 मिनिटांपासून 24 तासांपर्यंत निवडू शकता. कालावधी संपल्यानंतर स्थान शेअरिंग आपोआप थांबते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments