Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CBI अलर्ट : स्मार्टफोन युझर्सला Cerberus व्हायरसचा धोका

Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (14:34 IST)
सीबीआयने अलर्ट जाहीर करुन स्मार्टफोन यूजर्सला सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने इशारा जारी करत म्हटले की देशभरातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. 
 
करोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे. तसेच फिशींग (phishing) प्रकारच्या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जाते आहे. यासंदर्भातील इशारा सीबीआयने जारी केला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे अ‍लर्ट जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे. 
 
करोनामुळे जगभरामध्ये दहशत पसरल्याचा फायदा घेतला जात असून करोनासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी ट्रेण्डचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशातून सर्बेरसचा वापर केला जात आहे. सर्बेरसच्या माध्यमातून करोना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचे मेसेज यूजर्सला पाठवले जातात. करोनासंदर्भातील महत्वाची माहिती असल्याचे भासवून अधिक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. आणखी लिंकवर क्लिक करताच ट्रोजन स्मार्टफोनमध्ये इन्सॉटल होतो.
 
Cerberus हा ट्रोजन अंत्यत धोकादायक असून याने युजर्सची खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. बँकींगसंदर्भातील माहितीसाठी सर्बेरस खूप धोकादायक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. 
 
युजर्सच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी माहीती जसे क्रेडीट/डेबिट कार्ड डिटेल्स आणि इतर महत्वाची माहिती ट्रोजन चोरी करतो. जे अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले गेले आहे.

संबंधित माहिती

LSG vs CSK : लखनौने चेन्नईचा आठ गडी राखून पराभव केला

लोकसभा निवडणूक 2024:छगन भुजबळ यांनी नाशिक मतदार संघातून माघार घेतली

IPL 2024: हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी दिली वाईट वागणूक

प्रणिती शिंदेंच्या प्रचारात उतरला चक्क डुप्लीकेट शाहरुख खान

लोकसभा निवडणूक : संभाजीनगर लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला, चंद्रकांत खैरेंविरोधात शिवसैनिकाला तिकीट

मतचिठ्ठीवर गडकरींचा फोटो, कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

उद्धव ठाकरेंची शिवसेना संपावी असे आमचे स्वप्न

आता छगन भुजबळ मदत करतील का? भरत गोगावले म्हणाले...

IPL 2024 : हार्दिक पांड्याला BCCI ने दंड ठोठावला

मुंबईत उच्च न्यायालयाजवळील फोर्ट परिसरात इमारतीचा भाग कोसळला

पुढील लेख
Show comments