rashifal-2026

जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स

Webdunia
बुधवार, 18 एप्रिल 2018 (08:52 IST)
जीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता जीमेलमध्ये अनेक नवे फीचर्स पाहायला मिळणार आहेत.  जीमेलमध्ये आपोआप ईमेल डिलीट करणारं नवं फीचर येणार आहे. ठरावीक कालावधीनंतर ईमेल आपोआप डिलीट होईल असं हे फीचर असणार आहे. ईमेल कंपोज करताना युजर एका छोट्या ‘लॉक’ आयकॉनला क्लीक करुन पाठवत असलेल्या मेलची ‘एक्सपायरी डेट’ ठरवू शकतो.  ‘confidential mode’ असं या आयकॉनचं नाव आहे. म्हणजेच, ईमेल पाठवणारा व्यक्ती तो केव्हा डिलीट करायचा हे ठरवेल.
 

‘confidential mode’ नुसार ईमेल मिळालेला व्यक्ती मेलमधील कंटेंट कोणाशीही शेअर करु शकणार नाही. इतकंच नाही तर, कंटेंट कॉपी, डाउनलोड किंवा प्रिंट देखील करता येणार नाही. ईमेल केव्हा डिलीट करायचा याची वेळ मेल पाठवणारा (सेंडर) ठरवेल. मेल डिलीट करण्याची वेळ एक आठवडा, एक महिना किंवा काही वर्ष देखील असू शकते. याशिवाय नव्या मेलमध्ये पासवर्ड प्रोटेक्शनचं महत्त्वाचा पर्याय देखील दिला जाणार असल्याची माहिती आहे.  नव्या जीमेलमध्ये ई-मेल snooze करण्याचा पर्याय देखील असेल, तसंच कंपनी एक ऑफलाइन ईमेल स्टोरेजचा पर्याय देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments