Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्‌सअ‍ॅपचे हे 5 नवे दमदार फीचर

व्हॉट्‌सअ‍ॅपचे हे 5 नवे दमदार फीचर
, गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (14:51 IST)
व्हॉट्‌सअ‍ॅप नेहमीच आपल्या यूजरसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असतं. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कंपनी लवकरच नवे फीचर आणणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या फीचरची चाचणी घेतली जात आहे. आगामी काही आठवड्यांत हे नवे फीचर अपडेट केले जातील अशी अपेक्षा आहे.
 
आपोआप डिलिट होणार मेसेज
व्हॉट्‌सअ‍ॅपच्या या फीचरची यूजरना प्रतीक्षा आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी या फीचरचा बीटा व्हर्जन उपलब्ध करून दिला होता. यूजरनं सेट केलेल्या वेळेवर आपोआपच चॅट डिलिट होणार आहेत. चॅट डिलिट करण्यासाठी एक दिवस ते एका वर्षापर्यंत टाइम सेट करता येणार आहे. सुरुवातीला हे फीचर फक्त ग्रुप चॅटसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
 
ग्रुप चॅटफीचरमध्ये मोठा बदल
व्हॉट्‌सअ‍ॅप यंदा ग्रुप चॅटफीचरमध्ये मोठा बदल करणार आहे. रिपोर्टर्सनुसार, ग्रुप सदस्यांची संख्या वाढणारे फीचर लवकरच अपडेट करण्यात येणार आहे. सध्या व्हॉट्‌सअ‍ॅप ग्रुपमध्ये 256 सदस्यांना अ‍ॅड करता येतं. अन्य प्रतिस्पर्धी कंपन्या मेसेजिंग अ‍ॅपवर किमान 5 हजार सदस्य अ‍ॅड करण्याची सुविधा देत आहे. त्यामुळं स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे नवीन फीचर व्हॉट्‌सअ‍ॅप घेऊन येत आहे.
 
पर्सनल स्टोरेज
चॅटिंग हिस्ट्री आणि मीडिया फाइल्स सेव्ह करण्यासाठी हे नवीन फीचर आणले जाणार आहे. अँड्रॉइड यूजर व्हॉट्‌सअ‍ॅप चॅट गुगल ड्राइव्हवर, तर आयओएस यूजर आपले व्हॉट्‌सअ‍ॅप चॅट आयक्लाउडवर सेव्ह करतात.
 
सीक्रेट चॅट
यूजरच्या प्रायव्हसीसाठी येणारं फीचर खूपच उपयुक्त सिद्ध होईल. हे फीचर आल्यानंतर व्हॉट्‌सअ‍ॅपमधील चॅटिंग हिस्ट्री सर्व्हरवर स्टोर होणार नाही आणि ती ट्रॅकही केली जाऊ शकत नाही. चॅट सेव्ह करणसाठी जर कुणी स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर चॅट करणार्‍या दोघांनाही नोटिफिकेशन द्वारे माहिती मिळेल.
 
डार्क मोड
व्हॉट्‌सअ‍ॅप डार्क मोड या फीचरची खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे. डार्क मोड आल्यानंतर व्हॉट्‌सअ‍ॅपचा इंटरफेस डार्क होणार आहे. याचा फायदा यूजरना होणार आहे. चॅटिंगवेळी फोनच्या ब्लू लाइटमुळं डोळ्यांना त्रास होत होता. तो आता होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बच्चू कडू: 5 दिवस काम करणाऱ्यांना 7 दिवसांचा पगार का द्यायचा?