Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एन डी ए चा दीक्षांत सोहळा, कॅप्टन अक्षत राज प्रेसिडेन्ट्स गोल्ड मेडल

Webdunia
बुधवार, 30 मे 2018 (15:42 IST)

पुणे येथील खडकवासलामधील खेत्रपाल ग्राऊंडवर  नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात एनडीएच्या 134 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आपार पडला आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कोर्समध्ये बटालियन कॅडेट कॅप्टन अक्षत राज हा सुवर्ण पदकाचा (प्रेसिडेन्ट्स गोल्ड मेडल) मानकरी ठरला आहे. सोबत त्याचा सहकारी कॅडेट कॅप्टन मोहम्मद सोहेल अस्लमला रौप्य पदकाने (प्रेसिडेन्ट्स सिल्व्हर मेडल) गौरवण्यात आले आहे. स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन अली अहमद चौधरीला कांस्य पदक (प्रेसिडेंटस ब्राँझ मेडल) देवून गौरव करण्यात आले आहे. या सर्वांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला आहे. अक्षत राज हा मूळचा बिहारचा आहे. मोहम्मद सोहेल अस्लम पश्चिम बंगाल तर अली अहमद चौधरी आसामचा आहे.
 

राष्ट्रपतींनी कॅडेट्सना संबोधित केलं. संरक्षण सेवेमुळे देशाचं ऐक्य कायम आहे असं राष्ट्रपती म्हणाले. तसंच एनडीएचं ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीदवाक्य कायम स्मरणात ठेवण्याचं आवाहनही त्यांनी कॅडेट्सना केले आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थी आता देश सेवेत रुजू होणार आहेत.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments