Marathi Biodata Maker

दक्षिण कोरियात कपल्स घालतात एकसारखा ड्रेस

Webdunia
दक्षिण कोरिया हा अन्य देशांपेक्षा अनेक बाबतीत वेगळेपण जपणारा देश आहे. येथील लोक अंधश्रद्धाळू आहेत मात्र अनेक जुन्या परंपरांचे पालन आजही करणार्‍या या देशाची तंत्रज्ञानातील प्रगती लक्षणीय आहे. या देशात जगात सर्वाधिक वेगाने इंटरनेट चालते आणि 80 टक्के लोक त्याचा वापर करतात.
 
अनेक नावंत इलेक्ट्रॉनिक कंपन्या या देशात असून त्यांनी जगात त्याचा दबदबा निर्माण केला आहे. या देशात खूपच मजेशीर वाटतील अशा अनेक परंपरा आहेत आणि आधुनिक काळातही त्या पाळल्या जातात. येथे माणसाच्या रक्तगटाचा संबंध त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडला जातो आणि त्यामुळे मैत्री, जोड्या जमविताना कुठल्या रक्तगटाशी आपले जुळू शकेल याचा विचार केला जातो. येथील नागरिकांना प्लॅस्टिक सर्जरीचे वेड आहे. देशातील 1/3 महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी किमान एकदा तरी करतात. या उलट येथील पुरुष वर्ग मेकअपचा चाहता आहे. मित्रांसोबत हँगआउट अथवा गेट टुगेदर करण्यासाठी कोणत्याही सोयीच्या जागी असलेल्या स्त्रीत कॉर्नरलापसंती दिली जाते. येथील डेटवर असलेली तसेच विवाहित जोडपी एकसारखा पोशाख करण्यास प्राधान्य देतात. येथे दुकानात जोडप्यांना वापरता येथील असे पेअर्ड शूज, ड्रेस ळितात. नर्सरीतील मुलांना ठरावीक रंगाचा गणवेश दिला जातो. प्रेग्रंट महिलांना सरकार 500 डॉलर्स हे स्पेशल क्रेडीट कार्ड देते, त्यांच्यासाठी पार्किंगला खास जागा असते आणि सबवेमध्ये गुलाबी रंगाच्या सीट राखलेल्या असतात. येथील तमाम जनता पॉवर नॅप घेण्यात तरबेज आहे. येथील बहुतेक सर्वांना झोपेचे वरदान आहे. कर्मचारी वर्ग, विद्यार्थी चटकन कुठेही डुलकी घेतात आणि फ्रेश होतात. येथील सरासरी झोप घेण्याचे प्राण 4 ते 5 तास इतकेच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले असते तर त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह गमवावे लागले नसते रामदास आठवले यांचा दावा

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स' पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

उत्तराखंडमध्ये भूकंपाचे बागेश्वर ते ऋषिकेशपर्यंत धक्के जाणवले

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कोच सुरु होणार

पुढील लेख
Show comments