Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो

Webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:32 IST)
देशातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रत्येक 12 वर्षांत चार ठिकाणी या मेळ्याचे आयोजन होत असल्याने दर तीन वर्षांनी देशातील एका स्थानावर कुंभमेळा आयोजित होतो. यापैकी नाशिक आणि उज्जैनमध्ये एका वर्षांच्या अंतराने कुंभमेळा आयोजित केला जातो.
 
आता प्रश्न येतो की कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो तर यामागची पुराणकथा अशी आहे की, जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले होते. हे युद्ध सलग 12 दिवस चालले. या युद्धादरम्यान चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. हे थेंब पडलेले ठिकाण म्हणजे प्रयाग, ‍हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर 12 वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. आणि ज्या ठिकाणी हे थेंब पडले तिथे प्रत्येक 12 वर्षात कुंभमेळा भरतो.

संबंधित माहिती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

आंजनेय द्वादश नाम स्तोत्रम्

मुंबई सोबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना लू चे अलर्ट, हवामान खात्याने प्रचलित केली अनुक्रमणिका

मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा हनुमान चालीसा पठणाचा व्हिडिओ व्हायरल

सुनेत्रा पवारांना पोलिसांकडून मोठा दिलासा!

'मोदींना ज्यावेळी शिवीगाळ केली जाते तेव्हा मोठा विजय होतो', फडणवीसांचा शरद पवारांवर जोरदार प्रहार

डीआरडीओने बनवले देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट

पुढील लेख
Show comments