महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काल भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. सकाळी दहा वाजता ही मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ही बैठक पार पडेल. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
"लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?
आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी 11.00 वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे." असं ते ट्विटमध्ये म्हणाले.