Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shiv Aarti Marathi लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (08:44 IST)
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
 
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
 
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
 
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

संबंधित माहिती

आंजनेय द्वादश नाम स्तोत्रम्

Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा

Solah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

CSK vs LSG : लखनौ चेन्नईला पराभूत करण्याच्या प्रयत्नात आज हल्ला करेल

बलात्कारात अयशस्वी झाला म्हणून 4 वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून मृतदेह फेकून दिला, तिचे रक्ताने माखलेले कपडे घरात लपवले

राफेल नदाल बर्लिनमध्ये लीव्हर कपमध्ये शेवटची स्पर्धा खेळणार!

गरोदर पत्नीची 6 वर्षाच्या मुलीसमोर निर्घृण हत्या, पतीला अटक

Earthquake: तैवान काही तासांत भूकंपांनी हादरले

पुढील लेख
Show comments