धनगर आरक्षणा सदर्भात तत्कालीन फडणवीस सरकारने समाजाला सांगितले होते की आरक्षण देऊ परंतु त्यांच्या ५ वर्षांच्या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तर मराठा आरक्षणामध्ये राज्य सरकारच्या आयोगावरच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता इतरांनाही आरक्षण मिळावे हेच मत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी मागील सरकारवर आरोप केला आहे. धनगर आरक्षणाच्या संदर्भात मागच्या सरकारने सांगितले होते की, आम्ही आरक्षण देऊ परंतु त्यांनी ५ वर्षात आरक्षण दिले नाही. त्यांनी एका एजन्सीला काम दिले होते त्या एजन्सीकडून अहवाल आला आहे. वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख त्या अहवालामध्ये आहे. आम्ही याच मताचे आहोत की आज ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांच्या कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांनाही मिळावे असे आमचे मत आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.