जय देवा खंडेराया । निजशिवरुप सखया ॥ आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रीया ॥ धृ. ॥ देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर । तेथे तूं नांदतोसी ॥ आत्मसाक्षित्वे निर्धार ॥ उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सकुमार । भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ जय. ॥ १ ॥...