कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन विमान कंपन्यांना 31 मे पर्यंत तिकीट दर वाढविण्यास हवाई वाहतूक मंत्रालयाने मनाई केली आहे. कोरोना संकटामुळे विमान कंपन्यांकडून तिकिटांचे दर वाढवून नफेखोरी होऊ शकते, असेही हवाई वाहतूक मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी एकूण क्षमतेच्या तुलनेत 80 टक्के प्रवाशांची वाहतूक करण्याचे बंधन हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना घातले आहे. हे बंधनदेखील 31 मे पर्यंत कायम असणार आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने ग्रीष्मकालीन शेड्यूल अंतर्गत विमान कंपन्यांना 18 हजार 843 फेर्या करण्यास मान्यता दिली होती. मार्चच्या अखेरपासून सुरु होणार्यान या सेवा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत चालू राहतील. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली होती. त्याचा दणका विमान कंपन्यांना बसू शकतो.
नव्या प्राईस बँडनुसार दिल्ली-मुंबई रूटवर इकॉनॉमी क्लाससाठी एका बाजूचे भाडे 3900 ते 13 हजार रुपे इतके निश्चित करणत आलेले आहे. तत्पूर्वी हे भाडे 3500 ते 10 हजार रुपये इतके होते.