Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 5 दिवस बँका बंद ?

bank holiday
Webdunia
गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (08:39 IST)
येत्या 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर आणि त्यानंतर 8 आणि 9 सप्टेंबरला बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग संबंधीत काही कामं असतील तर ती येत्या दोन दिवसांत करून टाका असेही सांगण्यात येत आहे. कारण 1 सप्टेंबरला अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असते त्यामुळे यादिवशी त्या-त्या राज्यात बँकिंग व्यवहार होणार नाहीत. त्यानंतर 2 सप्टेंबरला रविवारची सार्वजनिक सुट्टी आहे. 3 सप्टेंबरला जन्माष्टमी आल्याने या दिवशी देखील बँका बंद राहतील. तसेच पेन्शनबाबतच्या मागणीसाठी बँकिंग कर्मचारी 4 आणि 5 सप्टेंबरला संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कामं होणार नाही. याचा फटका एटीएमला बसू शकतो. कारण बँका बंद असल्याने अनेक एटीएममध्ये नो कॅशचा बोर्ड झळकू शकतो. दरम्यान, 6 आणि 7 सप्टेंबरला बँकिंग कर्मचारी कामावर परत येतील. त्यानंतर 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार आणि 9 सप्टेंबरला रविवार असल्याने असून पहिल्या नऊ दिवसात फक्त 2 दिवस बँकिंग व्यवहार सुरू राहतील अशी शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

मराठा आरक्षणावर चर्चा होईल ! मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे भेटणार, मंत्री सामंत यांनी मार्ग मोकळा केला

पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी सक्तीची, भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्‍ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : खासदार वर्षा गायकवाड पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी, काँग्रेस म्हणाले हुकूमशाही सरकार

LIVE: खासदार वर्षा गायकवाड पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी

DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला

पुढील लेख
Show comments