rashifal-2026

भारतात क्रिप्टोकरन्सी व्यापारात क्रांती घडवण्यासाठी बीटबेचा भारतात प्रवेश

Webdunia
सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (10:48 IST)
भारतात क्रिप्टोकरन्सीच्या देवाणघेवाणीसाठी तसेच, व्यापारासाठी बीटबेतर्फे एक नवीन व्यासपीठ सादर करण्यात येत आहे. जवळजवळ २ लाखांहून अधिक ग्राहक असलेले बीटबे हे जगातील सर्वोकॄष्ट १० क्रिप्टोकरन्सी व्यापाराच्या व्यासपीठांपैकी एक आहे. बिट कॉईन्स, लाईट कॉईन्स, ईथर, लिसक, मोनेरो, डॅश आणि गेमक्रेडिट्स यांचा व्यापार व खरेदी-विक्री करण्याचा हा सर्वात सोपा व सुरक्षित मार्ग आहे. क्रिप्टोकरन्सीबाबतचे गैरसमज दूर करुन डिजीटल चलनाकडे बाजारपेठेतील बड्या गुंतवणूकदारांना आणि जास्तीत जास्त लोकांना आकर्षून घेणे, बीटबेच्या माध्यमातून विविध क्रिप्टोकरन्सींची देवाणघेवाण व व्यापार करणे ही बीटबे इंडियाची मूळ उद्दिष्टे आहेत. कोर्टयार्ड मॅरिएट हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या ब्लॉकचेन परिषदेत बीटबेचे सीईओ सिल्व्हेस्टर सुझेक आणि बीटबे इंडियाचे प्रमुख रोहित दाहडा उपस्थित होते. यावेळी त्यांना त्यांच्या कल्पक उत्पादनांविषयी माहिती दिली.
 
बीटबेचे सीईओ सिल्व्हेस्टर सुझेक म्हणाले, “ग्राहकांना कल्पक सेवा पुरवण्यासाठी तसेच जलद आणि सुरक्षित अर्थव्यवहार करुन क्रिप्टोकरन्सीच्या देवाणघेवाणीला सुरक्षितपणे चालना देण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.”
 
बीटबे इंडियाचे प्रमुख रोहित दाहडा म्हणाले, डिजीटायझेशनच्या वाटेवर असलेली भारत ही सर्वाधिक वेगाने वाढत जाणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. “आम्ही भारतात बीटबे ही कंपनी आणली आहे कारण भारतातील विविध क्रिप्टोकरन्सींना आमच्या एकसंध व्यासपीठाच्या माध्यमातून व्यापारी चालना देणे हा आमचा मूळ उद्देश आहे. बीटबे इंडियासाठी सर्व नियोजित नियम राबविण्यासाठी आम्ही सर्व गरजेच्या उपाययोजना राबवत आहोत. सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आम्ही लवकरच आमच्या व्यासपीठावर काही नवीन फिचर्स आणणार आहोत. आम्ही दर्जेदार सुरक्षा मॉडेल अंगिकारत असून सुरक्षित वित्त व्यवहारांसाठी दोन स्तरांचे ऑथेंटिकेशन मॉडेलही राबवणार आहोत.”    
  
इतर कोणत्याही वित्तीय देवाणघेवाण व्यासपीठावर पुरवले जात नाहीत असे फायदे बीटबे इंडिया या व्यासपीठावरुन ग्राहकांना मिळतात. यात कोल्ड वॉलेट पॉलिसी आणि २ एफए ऑथेंटिफिकेशन सोल्यूशन्सचा समावेश आहे. जगातील सर्वोत्कृष्ठ पेमेंट पुरवठादारांशी व स्थानिक सेवादारांशी संगनमत करुन बीटबे इंडियाने ग्राहकांना सुरक्षित व जलद डिपॉझिट्सचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. बीट कोईनव्यतीरिक्त बीटबे इंडियातर्फे ६ विविध क्रिप्टोकरन्सींचा स्थानिक चलनातील व्यापार मंजूर करण्यात आला आहे. १० ते २४ ऑगस्ट या कालावधीत बीटबेच्या ग्राहकांना प्रायोगिक तत्वावर क्रिप्टोकरन्सींची देवाणघेवाण करणे व बीटबेची कार्यप्रणाली समजून घेण्याची संधी देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर २४ ऑगस्टपर्यंत सर्व नोंदणीकृत सदस्यांना गेमक्रेडिट्स आणि मोबाईल गोतर्फे उच्च पातळीवरील वित्त व्यवहार करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

शिवसेनेच्या नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी रायगडमध्ये नऊ जणांना अटक

बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये 227 पैकी 207 जागांवर सहमती

जालन्यात दुर्दैवी अपघात, नदीच्या काठावर भरलेल्या खड्ड्यात 65 वर्षीय महिला आणि 5 वर्षांचा नातवाचा बुडून मृत्यू

LIVE: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजनची युतीची घोषणा

पुढील लेख
Show comments