Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जूनच्या वीजबिलात मिळणार मोठी सूट

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2020 (11:48 IST)
अवाजवी वीजबिल येण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. हजारांपासून कोट्यवधीपर्यंत लोकांना वीजबिल देण्यात (electricity bill discount)आले आहे, त्यामुळं एवढ्या रकमेते बिल भरायचे कसे? असा प्रश्न सध्या लोकांसमोर आहे. यातच आता महावितरण विभागाकडून ग्राहकांना विशेष सवलत देण्यात आली आहे.
 
महावितरण विभागाच्या वतीनं तीन महिन्याचे बिल एकत्रित एकरकमी भरल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. ग्राहकांना या 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर, मागणी करणाऱ्या ग्राहकांना तीन समान हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभाही देण्यात आली आहे.
 
वीज नियमक मंडळाच्या वतीनं लॉकडाऊन काळात मीटर रिडिंग व वीजबिल वितरण न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं ग्राहकांना सरासरी बिल देण्यात आले. मात्र वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारी अनेक भागातून समोर आल्या आहेत.
 
सध्या जून महिन्याच्या बिलाचे वितरण केले जात आहे. दरम्यान ग्राहकांना वीजबिलाबाबत माहिती देण्यासाठी महावितरण विभागाचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्यातूनही ग्राहकांना फायदा न झाल्यास energyminister@mahadiscom.in यावर तक्रारींचे निरसण केले जाईल.
वीज दराचा आदेश (electricity bill discount) कोविड-19 च्या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली. उदा. मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटीक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत.
 
जून 2020 घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची पद्धत
1. घरगुती ग्राहकांसाठी 3 हफ्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत.
2. महावितरण कार्यालयात जाण्याची कोणतीही गरज नाही.
3. कोणत्याही महावितरण केंद्रावर जाऊन 1/3 बील भरू शकता.
4. संपूर्ण वीजबिल एकत्र भरल्यास 2 % सूट
5. ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेच्या वीजबिल भरले असल्यास त्यांना देखील ती सूट देण्यात येईल.
6. जे घरगुती ग्राहक लॉकडाऊनमध्ये आपल्या मूळगावी गेल्यामुळे त्यांना सरासरी रिडींग पाठवले आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर रिडींग पाहून बील दिलं जाईल. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments