Festival Posters

धक्‍कादायक : सरकारी बँकांमध्ये 8,670 कर्ज घोटाळे

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (09:41 IST)
गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये भारतातील सार्वजनिक बँकांमध्ये 8670 कर्ज घोटाळ्यांची प्रकरणे नोंद झाली असून त्याची रक्‍कम तब्बल 61 हजार कोटी रुपयांची आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत हे घोटाळे झाले आहेत. यातही पीएनबी 389 प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 
 
गेल्या एकाच वर्षी 14,900 कोटी रुपयांची थकीत कर्जे वाढली आहेत. विशेष म्हणजे थकीत किंवा बुडीत कर्जांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. 2012 - 13 मध्ये 6,357 कोटी रुपयांच्या थकीत कर्जांचे प्रमाण आता वर्षाला 17,634 कोटी रुपये इतके फुगले आहे. ‘रॉयटर्स’ने 21 सरकारी बँकांपैकी 20 बँकांकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती, त्यातल्या 15 बँकांनी ही माहिती दिली आहे.
 
विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँक 389 प्रकरणांसह आघाडीवर असून गेल्या पाच वर्षांत एकूण घोटाळ्यातील कर्जाचा आकडा 6,562 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर  बँक ऑफ बडोदा दुसर्‍या स्थानावर असून या बँकेला 4,473 कोटी रुपयांना गंडवण्यात आले आहे. तर 231 घोटाळे करून बँक ऑफ इंडियाला 4,050 कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. तर स्टेट बँकेमध्ये पाच वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची एकूण संख्या 1,069 आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

लाडकी बहीण योजनेतील महिला हप्त्यांच्या प्रतीक्षेत, बुलढाणा जिल्ह्यातील महिलांनी निषेध केला

दिवसाढवळ्या आरडी एजंटची निर्घृण हत्या; गडचिरोली मधील घटना

LIVE: लाडकी बहीण योजनेसाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य

वराने स्वतः मुलगी निवडली...पण लग्नापूर्वी त्याने गळफास घेऊन आत्महत्या त्याचे कुटुंब मृतदेह घेऊन का फरार झाले?

बीएमसी निवडणुकीत हेराफेरीचे आरोप, वर्षा गायकवाड म्हणाल्या लोकशाहीवर हल्ला झाला, धमकावून उमेदवारांना काढून टाकण्यात आले

पुढील लेख
Show comments