Dharma Sangrah

वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणला यापूर्वीच सर्वात मोठा फटका बसला : नितीन राऊत

Webdunia
गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (08:24 IST)
कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याची कबूली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटर संदेशात दिली आहे. मात्र, यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारनं पुरेशी कार्यक्षमता न दाखवल्यानं आणि वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणला यापूर्वीच सर्वात मोठा फटका बसला आहे असंही त्यांनी सांगितलं.

भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोचल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. कोरोना महामारीच्या काळात वीज बिलं भरली न गेल्यामुळे महावितरणची थकबाकी नऊ हजार कोटींनी वाढून ऑक्टो्बरमध्ये ५९ हजार १०२ कोटींवर पोचल्याचं त्यांनी सांगितलं.

मार्च २०२० मध्ये घरगुती ग्राहकांकडे असलेली १ हजार ३७४ कोटींची थकबाकी ही ४ हजार ८२४ कोटींवर, वाणिज्य ग्राहकांची थकबाकी ८७९ कोटींवरून १ हजार २४१ कोटीपर्यंत तर औद्योगिक ग्राहकांची थकबाकी ४७२ कोटींवरून ९८२ कोटींवर  पोहोचल्याचं त्यांनी एका अन्य ट्विटद्वारे सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

वाशिममध्ये शिवसेना यूबीटी उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी पदाचा राजीनामा दिला

नाशिक कुंभमेळ्यापूर्वी अनेक वृक्षांची कत्तल

बंदूकधाऱ्यांनी कॅथोलिक शाळेतील 200 हून अधिक मुले आणि 12 शिक्षकांचे अपहरण केले

LIVE: लाडकी बहिन योजनेत सरकारने ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

इंदूर वंदे भारतमध्ये आता 16 कोच असतील; 24 नोव्हेंबरपासून बदल लागू

पुढील लेख
Show comments