Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'रियलमी'कडून भारतीय बाजारात पहिल्यांदा स्मार्ट टीव्ही सीरीज आणि वॉच लॉन्च

Webdunia
बुधवार, 27 मे 2020 (08:00 IST)
स्मार्टफोन निर्माता कंपनी 'रियलमी'ने भारतीय बाजारात पहिल्यांदा स्मार्ट टीव्ही सीरीज आणि वॉच लॉन्च केलं आहे. कंपनीने मीडियाटेक 64-बीट क्वाड-कोर प्रोसेसर आणि डॉल्बी ऑडिओ-सर्टिफाइड 24 वॉट क्वाड स्टिरियो स्पीकरसह स्मार्ट टीव्ही बाजारात आणला आहे. कंपनीकडून टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी आणि एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देण्यात येत आहे. हा स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राईम व्हिडिओ यासारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या सुविधेसह बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. या टीव्हीला क्रोमा बूस्ट तंत्रज्ञान देण्यात आलं आहे, जे 400 एनटीएस अल्ट्रा ब्राइटनेस प्रदान करु शकेल. 
 
'रियलमी'च्या 32 इंची टीव्हीची किंमती 12 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 43 इंची टीव्हीसाठी 21 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. रियलमी स्मार्ट टीव्हीची विक्री रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर 2 जूनपासून सुरु होणार आहे.
स्मार्ट वॉचमध्ये 1.4 इंची कलर टचस्क्रिन, रियल टाईम हार्ट रेट मॉनिटर आणि एसपीओ2 मॉनिटर म्हणजेच ब्लड-ऑक्सिजन लेव्हल यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. हे वॉच 2.5 डी कॉर्निंग गोरिला ग्लास-3 प्रोटेक्शनसह लॉन्च केलं आहे. वॉचमध्ये आयपी68 रेटिंग देण्यात आलं आहे. याचा अर्थ धूळ आणि पाण्यापासून या वॉचचा बचाव केला जाईल. याचा बॅटरी बॅकअप सात ते नऊ दिवसांपर्यंत आहे. शिवाय पॉवर-सेव्हर मोडमध्ये या वॉचची बॅटरी 20 दिवसांपर्यंत टिकू शकते.
 
'रियलमी' स्मार्ट वॉचची किंमत 3,999 रुपये इतकी आहे. 5 जूनपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर 2 जूनपासून विक्री सुरु होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

वडेट्टीवार म्हणाले- पटोले यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही

एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

LIVE:30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार

शिवसेना UBT यांनी आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, सुनील प्रभू बनले मुख्य व्हीप

Maharashtra : 30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार!

पुढील लेख
Show comments