Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बृहन्मुम्बई अर्थसंकल्प 2022-23 संदर्भात विविध क्षेत्रातील तज्ञांचे मत काय आहे?

What is the opinion of experts in various fields regarding Brihanmumbai Budget 2022-23?
Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (15:52 IST)
नुकताच बृहन्मुम्बई महापालिकेने अर्थसंकल्प 2022-23 मंडला आहे. विविध क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल? यामध्ये नेमक विशेष काय आहे, सामान्य वर्गाला अणि उद्योग क्षेत्राला याचा कसा फायदा होईल. आरोग्य क्षेत्रावर कसा परिणाम होईल याबद्दल विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपली मते मांडली आहेत. जाणून घ्या त्यांच्याकडून या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा होती आणि हा अर्थसंकल्प किती प्रभावी ठरतो.
 
शिक्षण विभाग:
हर्ष भारवानी, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, जेटकिंग इन्फोट्रेन
"जसा काळ बदलत आहे तसे, शिक्षण क्षेत्राने आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचे नवीन मार्ग लागू केले आहेत, जेणेकरून ह्या कठीण काळातही त्यांची कौशल्ये विकसित होतील. सरकार कौशल्य विकास प्रयोगशाळांवर लक्ष ठेवून आहे, त्याप्रमाणे   २०२५ पर्यंत ५०% विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल जो एक महत्वाचा भाग ठरणार आहे. नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात शिकण्यावर भर देऊन, विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये शिकण्यास आणि विकसित करण्यात मदत करण्यासाठी असा उपक्रम सुरु केल्याबद्दल आम्हाला सरकारचा अभिमान आहे. बीएमसी शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू झाल्यामुळे, शाळांना शिकण्याचा आणि ज्ञान मिळविण्याचा एक मजेदार मार्ग उपलब्ध होईल. बीएमसीचा यंदाचा अर्थसंकल्प ऐकल्यानंतर आम्हाला अभिमान वाटतो आणि आशा आहे की राज्यात असे आणखी नवनवीन प्रयोग केले जातील.”
 
आरोग्य विभाग:
डॉ. विवेक तलौलीकर, सीईओ, परळ, मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल
“BMC ने आज २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडला आहे. विशेषत: कोविड १९ महामारीमुळे आरोग्य सेवा क्षेत्राकडे लक्ष वेधले आहे. गेल्या वर्षीच्या आरोग्य बजेटच्या तुलनेत यंदा आरोग्य पायाभूत सुविधांचा खर्च वाढवण्यात आला आहे. जीनोम चाचणीसाठी R&D ला चालना दिल्याने असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांच्या वाढीच्या दुहेरी आव्हानावर मात करण्यास चालना मिळेल आणि भविष्यातील साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी एक प्रणाली देखील तयार होईल. मुंबईतील नागरिकांना लसीकरण करण्यात बीएमसीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यांनी इतर खासगी रुग्णालयांप्रमाणेच काम केले आणि त्यामुळेच आता मुंबई मॉडेल देशभरात चर्चेत आहे. MCGM ने खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालये एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित आणले आहे, एक वॉर रूम तयार केली आहे आणि प्रत्येक रुग्णाचा शोध, त्यांचे तपशील, होम क्वारंटाइन रूग्णांना रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया आणि काही यशस्वी उपचार प्रोटोकॉल देखील ठरवले आहेत.”
 
डॉ तरंग ग्यानचंदानी, सीईओ, सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल
"बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या आज २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय घोषणा करण्यात आली. हे अर्थसंकल्प आरोग्य सेवा क्षेत्राला समर्थन दर्शविणारे अतिशय आश्वासक आहे. आरोग्य पायाभूत सुविधांचा खर्च ६९३३ कोटी रुपयांपर्यंत वाढवणे ही काळाची गरज होती. सध्याच्या कोविड-19 साथीच्या रोगाने आपल्याला शहर आणि तेथील लोकांसाठी आरोग्यसेवा आपत्कालीन परिस्थितीशी लढताना किंवा त्याचे व्यवस्थापन करताना मजबूत पायाभूत सुविधांचे महत्त्व स्पष्टपणे दाखवून दिले आहे. तरीही शहराने कोविडचा सामना करण्यासाठी एक अप्रतिम पायाभूत सुविधा उभारून उत्तम प्रतिसाद दिला आहे. आणि जगासमोरील एक  सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून समोर आले. पण समाजाच्या आणि लोकांच्या अपेक्षा आणि आरोग्यसेवा गरजा यांच्याशी जुळवून घेऊन हे अर्थसंकल्पातील आरोग्य सेवे संदर्भातील वाटप हे अत्यंत आवश्यक आहे. या वाटपामुळे शहरातील आरोग्य सेवा परिसंस्थेला बळकट करण्यात मदत होईल आणि आपल्या नागरिकांना सुलभता, अपग्रेडेशन आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात मदत होईल.
 
एकूणच हा अर्थसंकल्प शिक्षण संक्षेत्राला डिजिटल स्वरूपात नाक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आरोग्य क्षेत्रासाठी केलेली भरीव तरतूद आरोग्य क्षेत्राला अधिक मजबूत करेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलेला दिसून येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

टीम इंडियाचे स्टार खेळाडू केएल राहुल एका गोंडस मुलीचे बाबा झाले

नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरांचे बुलडोझर पाडण्यास बंदी, न्यायालयाने प्रशासनाला फटकारले

LIVE: नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरांचे बुलडोझर पाडण्यास बंदी

नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडले

बोईंगने भारतात 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

पुढील लेख
Show comments