Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खरी बंदूक हातात घेण्याचा अनुभव शहारे आणणारा-अनुजा साठे

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (10:28 IST)
हातात खरी बंदूक घेऊन चालवणे, किती भीतीदायक असू शकते, याची आपल्याला तितकीशी कल्पना नाही. अनेक देशभक्ती किंवा गॅंगवॉरवर आधारित चित्रपटांमध्ये आपण गुंडांना किंवा दहशतवाद्यांना अगदी सहजरित्या गोळीबार करताना, रक्तपात घडवताना पाहातो. ते पाहाण्यात आपण इतके तल्लीन होऊन जातो की, ते सर्व खोटे आहे हेही आपण पूर्णपणे विसरतो. इतक्या कौशल्याने हे चित्रित केले जाते. एमएक्स प्लेअर ओरिजनलच्या 'एक थी बेगम २' या वेबसिरीजची नायिका अनुजा साठे हिने पडद्यावर अतिशय सहजरित्या बंदूक हाताळली आहे. अर्थात त्यासाठी तिने प्रशिक्षण घेतले. 
 
बंदूक हाताळण्याच्या अनुभवाबद्दल अनुजा साठे म्हणते, '' आयुष्यात पहिल्यांदा हातात जेव्हा मी बंदूक घेतली होती तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते. आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही. 'एक थी बेगम २' मधील माझी भूमिकेची गरज म्हणून मी बंदूक हाताळली, तो अनुभव खूपच दडपण आणणारा आणि भीतीदायक होता. परंतु जेव्हा तुम्ही सूडाच्या भावनेने जेव्हा पेटलेले असता, तेव्हा हे सर्व नगण्य होऊन जाते. शूटिंगच्या सेटवर बंदूक चालवण्याअगोदर मी  प्रशिक्षण घेतले होते, ज्याचा मला निश्चितच फायदा झाला.''  
 
एक थी बेगम च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात लीला पासवानच्या शोधाने सुरु होते. मृत्यूचे सोंग घेतलेली अशरफ दुबईचा डॉन मकसूद (अजय गेही) ला संपवण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावते. आपला पती झहीरच्या(अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेवर ती ठाम राहाते. अशरफ स्वतःला गुन्हेगारी जगतात झोकून देते. 
 
सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित 'एक थी बेगम'च्या दुसऱ्या सीझनमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसाटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णानदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  
             
एमएक्स प्लेअर ओरिजनलची 'एक थी बेगम २' प्रेक्षकांना ३० सप्टेंबरपासून विनामूल्य पाहता येतील

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments