Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कैरी’या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण पूर्ण

Webdunia
शनिवार, 6 मे 2023 (07:58 IST)
social media
‘कैरी’ या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण पार पडले. हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे, हे जरी अद्याप कळले नसले तरी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून या चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका असल्याचे कळतेय. याव्यतिरिक्त या चित्रपटात अरुण नलावडे, सुलभा आर्या आणि काही ब्रिटिश कलाकारही आहेत.
 
‘कैरी’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक शंतनु रोडे यांनी केले असून यापूर्वी त्यांनी गोष्ट ‘गोष्ट एका पैठणीची’चे दिग्दर्शक केले होते. ‘कैरी’च्या निमित्ताने पुन्हा एकदा पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक – अभिनेत्री म्हणजेच शंतनु रोडे आणि सायली संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘कैरी’चे ‘पोस्टर’ही झळकले असून त्यात एक पाठमोरी मुलगी हातात सामान घेऊन परदेशात फिरताना दिसतेय. त्यामुळे आता हा चित्रपट काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.
या चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड यांनी ९१ फिल्म स्टुडिओज बॅनर अंतर्गत केली असून निनाद बत्तीन, तबरेझ पटेल, एव्हीके एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. ‘ कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी आणि शंतनु रोडे यांनी केले आहे. ९१ फिल्म स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा यांनी आतापर्यंत दहा प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली असून यात मराठी, मल्याळम, बंगाली आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

जमिनीवर बसून चहा प्यायले, हातात झेंडा घेऊन चालले, Bageshwar Baba यांच्या यात्रेत Sanjay Dutt यांचा नवीन अवतार

चंदिगडमध्ये गायक आणि रॅपर बादशाहच्या नाईट क्लबवर बॉम्ब हल्ला

स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार झाशीचा किल्ला

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments