rashifal-2026

सकाळी उठल्यावर मोबाइल वापल्याने....

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (20:41 IST)
सकाळी उठल्यावर तुमचा हात सर्वप्रथम मोबाइलकडे जातो का, सोशल मीडिया, ईमेल्स बघितल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरूवात होत नाही का, या प्रश्नांची उत्तरे ‘हो’असतील तर तुम्ही सावध  व्हायला हवे. असे केल्यामुळे तुमचे बरेच नुकसान होत आहे हे लक्षात घ्या. 
 
मध्यंतरी ब्रिटनमध्ये दोन हजार लोकांवर एक सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी उठल्यानंतर मोबाइल फोन बघणार्‍यांच्या दिवसाची सुरूवात ताणाने होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले.
हे लोक दिवसभर तणावात राहातात आणि त्यांना दैनंदिन कामे करताना अडचणी येत असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.
 
सकाळी मोबाइलमधले संदेश वाचल्यानंतर आपले मन त्यांचाच विचार करते. याचा कामावर विपरीत परिणाम होऊ लागतो. आपली कार्यक्षमता कमी होऊ लागते. दिवसभर एकाच गोष्टीचा विचार करत राहिल्याने ताण वाढतो. शिवाय अस्वस्थताही जाणवते. वर्तमानाऐवजी आपण भूतकाळाचा विचार करू लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल बघू नये, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
अभय अरविंद

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

नागपुरात बिबट्याची शिकार, ३ जणांना अटक; वन विभागाची मोठी कारवाई

लोकायुक्त कायद्यामुळे संतप्त अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी २०२६ पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला

Winter Session नागपूर स्कूल व्हॅन अपघातात परिवहन मंत्री सरनाईक यांनी आरटीओला निलंबित करण्याची घोषणा केली

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

LIVE: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन

पुढील लेख
Show comments