Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील पहिला संस्कृत इंटेरनेट रेड़िओची सुरवात

Webdunia
शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (11:57 IST)
संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, खांडबहाले.कॉम निर्मित जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटेरनेट-रेड़िओ जागतिक-संस्कृत-दिनी अॉनलाईन प्रसारित करण्यात आला.
 
'श्रवण' हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपद्धति, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळुहळू ती भाषा आपसुकच ओठावर येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना असते परंतु सोयिनुसार व पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही असे लक्षात आल्यावर नाशिकस्थित खांडबहाले॰कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, २४ तास व सातहि दिवस (२४x७) अव्याहतपणे सुरु राहिल असा 'संस्कृत-इंटेरनेट-रेड़िओ' 'जागतिक-संस्कृत-दिना'च्या औचित्याने संस्कृतप्रेमींसाठी आज अॉनलाईन प्रसारित केला.
 
याविषयी संस्थेचे संचालक सुनील खांडबहाले यांनी सांगीतले कि, मी संस्कृतभारतीचा विद्यार्थी आहे. संस्कृत भाषेचे अध्ययन करत असताना संस्कृत भाषा कानावर पड़त होती परंतु एकदा वर्गाबहेर पडले की संस्कृत-श्रवण दुर्मिळ होते. संस्कृत स्तोत्र, श्लोक, गीतं अनेक वेबसाइट्स वर अस्ताव्यस्त स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु व्यवहारिक जीवनाशी सबंध सांगता येईल असे संवदात्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादन-संकलित करणे आणि २४ तास अव्याहत श्रवण करता येऊ शकेल इतके सुसहय करणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे खरं तर स्वतःसाठी संस्कृत-संभाषण शिकण्याचे साधन म्हणुन मी इंटरनेट रेड़िओ डिज़ाइन केला. पुढे अनेकांच्या अग्रहास्तव आणि सहभगातून संस्कृत इंटेरनेट रेड़िओला मूर्त रूप देणयात आले.
 
यामध्ये विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद-संभाषणं (जसे शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य संवाद, मित्र-संवाद, शाळा, कार्यालय, दवाखाना आदी प्रसंग-संवाद), विषयवार धड़े, व्याकरण पाठ, शब्दसंग्रह, दैनंदिन जीवनातील वस्तु-संबंध, लघुकथा-बोधकथा, गीतं, कविता, सुभाषितं असा मनोरंजनात्मक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. जगभरातिल व्यापक लोकसहभागातून प्रसारित केला जाणारा इंटेरनेटवर हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. www.khandbahale.com/sanskrit किंवा https://tinyurl.com/sanskritradio या संकेतस्थळावर संस्कृत रेड़िओ ऐकण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा अॅप डाउनलोड किंवा इंस्टाॅल करावे लागत नाही. आपले दैनंदिन काम करता-करता स्मार्टफ़ोन, टॅबलेट तसेच संगणकावर संस्कृत इंटेरनेट रेड़िओ श्रवणाची सुविधा असल्याने श्रोत्यांसाठी अधिक सोयीचे आहे. नजिकच्या काळात सर्वसमावेशक व दर्ज़ेदार कार्यक्रम निर्मितिसाठी जगभरातील संस्कृतप्रेमी आपले योगदान देऊ शकतील व अभिव्यक्त होऊ शकतील अशी योजना असल्याचे सुनील खांडबहाले यांनी सांगीतले. त्यासाठी विषयतज्ञ आणि संस्कृतप्रेमींच्या सूचना प्रार्थनिय असल्याचे त्यांनी आवाहन केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments