Dharma Sangrah

संत तुकारामांचे शब्दावरील सुंदर काव्य

Webdunia
शनिवार, 27 जून 2020 (14:15 IST)
घासावा शब्द | तासावा शब्द | 
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा 
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
 
बोलावे मोजके | नेमके, खमंग, खमके | 
ठेवावे भान | देश, काळ, पात्राचे
 
बोलावे बरे | बोलावे खरे | 
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
 
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म |  काढूच नये ||
 
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे | 
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
 
शब्दांमध्ये झळकावी |  ज्ञान, कर्म भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा |  प्रत्येक शब्द |
 
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल | 
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं || 
 
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता | 
पाणी, वाणी, नाणी | नासू नये || 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

U19 World Cup वैभव सूर्यवंशी बांगलादेशविरुद्ध खेळणार, सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार जाणून घ्या

LIVE: भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील वाळू माफियांच्या १६ ठिकाणी ईडीचे छापे

महानगरपालिका निवडणुक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

नितेश राणेंचा हसण्याचा VIDEO व्हायरल

पुढील लेख
Show comments