Festival Posters

स्मृतिदिन : थोरले बाजीराव

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (08:37 IST)
हिंदवी स्वराजची कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर पसरविणार्‍या आणि युगप्रवर्तक छ. शिवरायांचा वारसा खर्‍या अर्थाने चालविणार्‍या थोरल्या बाजीरावांचा आज स्मृतिदिन. बाळाजी विश्वनाथ भटांचा हा थोरला पुत्र. आपल्या सर्व सरदारांमध्ये मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून ती सिद्धीस नेणारा आणि चहूदिशांना मराठी सत्तेच्या नौबती वाजविणार्‍या या प्रतापी बाजीरावाने स्वकर्तृत्वावर दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. 
 
 दाभाडे, निजाम व दिल्लीकरांशी झालेला लढा, पालखेडची लढाई, डभई व भोपाळची रणयुद्धे, बुंदेलखंड व औरंगाबादचा रणसंग्राम ही थोरल्या बाजीरावाच्या पराक्रमाची ठळक स्थाने. चिमाजी आप्पांसारखा पराक्रमी व मुत्सद्दी भाऊ, होळकर, शिंदे, पवारांसारखे पराक्रमी सरदार यांच्या बळावर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा लौकिक वाढविला. ‘मर्द त्या मराठी फौजा। रणकीर्ती जांच गाव। तळहाती शिर घेवूनिया, चालुनी तटावर जाव्या। जणु घोंघावत मधमाशा, झणि मोहळास बिलगाव।’अशी वृत्ती मराठी फौजांत निर्माण करणारा हा प्रतापी बाजीराव. 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचे निधन झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात आज स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी तीव्र आंदोलन पुकारणार

पुढील दोन दिवस काही भागात तीव्र उष्णतेचा इशारा तर 13 व 15 मार्चदरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना 'कायदेशीर दर्जा' मिळेल, सुनेत्रा पवार विशेष विधेयक सादर करणार!

गॅस किंवा पेट्रोलची कमतरता नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयात 'धनुष्यबाण'वरून मोठी लढाई! उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे वाद कोणते नवे वळण आणेल?

पुढील लेख
Show comments